Share

‘चकदा एक्प्रेस’ चित्रपटाचा फस्ट लूक शेअर ; जाणून घ्या कोण असणार महिला क्रिकेटरच्या भूमिकेत?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार झूलन गोस्वामी(Jhulan Goswami) हिच्या जीवनावर आधारित असलेला ‘चकदा एक्प्रेस’ (Chakda xpress) बायोपिक चित्रपट आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करत टीजर रिलीज करण्यात आला आहे.

अनेक खेळाडू क्रीडा जगतात प्रवेश करतात, ज्यामध्ये प्रत्येकाच्या नशिबी यश मिळत नाही. खूप कमी खेळाडू आहेत जे यशाची उंची गाठू शकतात. त्याच वेळी, त्यात काही निवडक खेळाडू आहेत, ज्यांच्या जीवनावर आणि करिअरवर बायोपिक बनवला आहे. भारतात अनेक पुरुष क्रिकेटपटूंचे आयुष्य पडद्यावर दाखवण्यात आले आहे, मात्र पहिल्यांदाच महिला क्रिकेटरवर बायोपिक येणार आहे. ही महिला खेळाडू दुसरी कोणी नसून भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी आहे. झुलनच्या बायोपिकमध्ये अनुष्का शर्मा (Anushka Sharma) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

https://twitter.com/AnushkaSharma/status/1478940165418610688?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1478940165418610688%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.timesnowhindi.com%2Fcricket%2Farticle%2Fchakda-xpress-movie-who-is-jhulan-goswami-whose-story-will-be-retold-in-chakda-xpress-by-anushka-sharma%2F380974

नुकतच अनुष्का शर्माने तब्बल तीन वर्षानंतर पडद्यावर कमबॅक करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. महिला किक्रेटमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या भारताची दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामी हिच्या भुमिकेत अनुष्का दिसणार आहे. भारताची दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामी हिचे महिला क्रिकेटमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. या वेगवान गोलंदाजीने तिने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये स्वत:ला स्टार असल्याचे सिद्ध केले आहे. गेल्या दोन दशकांपासून ती भारताचे प्रतिनिधित्व करत आहे, ज्यामध्ये तिने एकामागून एक अनेक विश्वविक्रम केले. चित्रपटाच्या माध्यमाने ही भूमिका अनुष्का शर्मा वठिवणार असून चाहत्यांना मात्र चित्रपटाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!