Share

Devendra Fadnavis : “मी पुन्हा आलो, पण एकटा नाही आलो, शिंदेंना सोबत घेऊन आलो” – देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई : आज राज्य विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. यापूर्वी रविवारी संध्याकाळी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेना आमदारांच्या गटाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार आणि पक्षाच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईतील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. यानंतर शिवसेनेच्या आणखी एका आमदाराने शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाची ताकद वाढली. आज झालेल्या बहुमत चाचणीत शिंदे गट आणि भाजप सरकारने बहुमत चाचणी पास केली.

164 पेक्षा जास्त मते शिंदे गट आणि भाजपला मिळाली. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा झटका मानला जात आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदनाच्या प्रस्तावाचं भाषण सुरु झालं. यावेळी फडणवीस म्हणाले की, शिवसेना भाजप युतीचे आमचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला याबाबत मी शिंदे यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. यानंतर शिवसेना भाजप युतीचा विजय असो, अशी घोषणाबाजी करत शिंदे सर्मथकांकडून जल्लोष करण्यात आला.

यानंतर पुढे फडणवीस म्हणाले कि, मविआ सरकार अनैसर्गिक आहे, ते टिकणार नाही, मी कविता म्हटली होती की मी पुन्हा येईन, त्यावरही माझी टिंगल उडवली, पण मी आलो, एकटा नाही आलो, शिंदेंना सोबत घेऊन आलो. ज्यांनी माझी टिंकल टवाळी केली, त्यांचा मी बदला घेणार आहे. बदला हा आहे, की मी त्यांना माफ केलंय. प्रत्येकाची वेळ येते, असं ते म्हणाले. यानंतर पुढे दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, काच के खिलोने हवा मे उछाले नहीं जाते.. कोशिश करने से हर मुश्लिल होती है आसान, तकदीर के भरोसे काम टाले नहीं जाते.., असा शेर देखील फडणवीसांनी बोलून दाखवला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!