Share

“मी अष्टपैलू खेळाडू आहे पण हार्दिकसोबत तुलना करू नका” शार्दुलचे मोठे वक्तव्य

Published On: 

मुंबई : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर सध्या आपल्या फलंदाजीमुळे चर्चेत आला आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शार्दुलने लोअर ऑर्डर मध्ये बॅटिंग करताना संघाला चांगल्या स्थितीत आणले होते. आता शार्दुल ठाकूरला संघातील अष्टपैलू खेळाडूच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. हार्दिक पंड्याच्या दुखापतीमुळे शार्दुलला सध्यातरी टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळत आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने अष्टपैलू म्हणून या नवी भूमिकेबाबत सांगितले आहे. तो म्हणाला ” मी स्वत:ला अष्टपैलू मानतो. मला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी स्वतःला सिद्ध करेल. जेव्हा फलंदाज सातव्या क्रमांकावर धाव करतो तेव्हा संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत घेऊन जातो. त्यामुळे मोठा फरक पडतो. माझ्याकडे आधीपासूनच फलंदाजी करण्याची प्रतिभा होती. मात्र, मधल्या काळात फलंदाजी करण्याची फारशी संधी मिळाली नाही, विशेषत: रणजी ट्रॉफी स्पर्धेत. मला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली तेव्हा मी संघातील इतर गोलंदाजांपेक्षा चांगली फलंदाजी करून दाखवली आहे. ”

हार्दिक पंड्यासोबत अष्टपैलू म्हणून होणाऱ्या तुलनेबाबतही त्याने यावेळी सांगितले आहे. ” हार्दिक लवकरच तंदुरुस्त होऊन संघात पुनरागमन करेल. आमच्या दोघांची फलंदाजीची पद्धत वेगळी आहे. हार्दिक पाच किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो तर मी सात किंवा आठव्या क्रमांकावर फलंदाजी करतो, त्यामुळे आमच्यामध्ये कोणतीही स्पर्धा नाहीये. हार्दिकसोबत माझी तुलना होऊ शकत नाही. मी त्याची जागा घेण्याचा विचार करत नाही. मी त्याला जेवढे ओळखतो, त्याने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे. तो त्याचे अनुभव माझ्यासोबत शेअर करतो. मी पण तेच केले आहे. शार्दुल ठाकूर वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्यात खेळताना दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!