🕒 1 min read
नागपूर : बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा मी तिथे हजर होतो, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या सभेत केला होता. यावर आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना जोरदार टोमणा लगावला होता. १८५७ च्या युद्धातही फडणवीसांचं योगदान असेल, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला होता. आदित्य ठाकरेंच्या टोमण्यावर फडणवीसांनीही आता जोरदार उत्तर दिलं आहे.
“मी हिंदू आहे. मागील जन्मावर आणि पुनर्जन्मावर माझा विश्वास आहे. १८५७ च्या युद्धातही झाशीच्या राणीसोबत आणि तात्या टोपेंसोबत लढत असेन. पण आपण तेव्हाही इंग्रजांसोबत असाल”, असं म्हणत फडणविसांनी आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला लगावला.
आदित्य ठाकरेंनी कोणती टीका केलेली?
बाबरी मशीद पाडण्यात माझाही सहभाग होता, आपण त्यावेळी तिथे उपस्थित होतो, असा दावा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर शिवसेनेचे नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली होती. १८५७ च्या लढ्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. पण या गोष्टीत जाण्यापेक्षा, या वादात जाण्यापेक्षा राम मंदिर चांगलं होत आहे. कोर्टाने निकाल चांगला दिला. शिवसेनेने संघर्ष केला. चांगलं काम होत आहे. आता महाराष्ट्रासमोर बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्यावर राजकीय पक्षांनी बोललं पाहिजे. चर्चा केली पाहिजे. आम्ही विकासाची कामं करत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
