Share

हुश्श! शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला; महावितरणने वाढवून दिली मुदत

Published On: 

लातूर : शहराचा थकित वीजबिलापोटी खंडीत केलेला वीजपुरवठा महावितरणने रविवारी पुन्हा सुरु केला. रविवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पुर्वरत झालेल्या विजपुरवठ्यानंतर शहराचा पाणीपुरवठा दुपारी २ वाजेच्या सुमारास पुर्वरत झाला. यादरम्यान जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी महावितरणच्या सहसंचालकाशी चर्चा केल्यानंतर महावितरणने वीज बिल भरण्याची मुदत वाढवून दिली आहे.

लातूर मनपाकडे महावितरणचे २ कोटी ६८ लाख वीज बिल थकित होते. ही थकबाकी लवकरात लवकर पुर्ण भरण्यासाठी महावितरणने मनपाला मुदत दिली होती. पण दिलेल्या मुदतीत वीज बिल न भरल्याने महावितरणने शुक्रवारी सांयकाळी मांजरा धरणावरील वीज पुरवठा खंडीत केला होता. त्यामुळे संपुर्ण लातूर शहराचा पाणी पुरवठा बंद झाला. दरम्यान जिल्हाधीकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी महावितरणच्या सहसंचालकाशी चर्चा केल्यानंतर महावितरणने वीज बिल भरण्याची मुदत वाढवून दिली.

यानंतर महावितरणने धनेगाव एक्सप्रेस फिडर लाईनवरुन विद्युत पुरवठा सुरु करण्यात आला. यानंतर १५ मिनीटांत पंपिंग सुरु झाले. आणि दुपारी २ वाजेच्या सुमारास धनेगाव येथून पाणी लातूर शहरात दाखल झाले आणि शहरवासीयांनी सुटकेचा निश्वास टाकला. यानंतर शहरातील बसवेश्वर कॉलनी, शासकीय कॉलनी, राजधानी हॉटेल येथील पाण्याच्या टाकीवरुन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!