🕒 1 min read
मुंबई : रविवारी रात्री अभिनेता अर्जुन कपूर मीडियावर जाम भडकला होता. होय, एका फोटोग्राफरवर अर्जुन असा काही बिथरला की, सगळेच हैराण झालेत. यावेळी अर्जुन कपूरसोबत गर्लफ्रेंड मलायका अरोराही होती. बॉयफ्रेन्डचा हा अँग्री अवतार पाहून मलायका देखील घाबरली होती.
तर घटना आहे, करिना कपूर व सैफ अली खानच्या घराबाहे घडली. अर्जुन कपूर गर्लफ्रेंड मलायका सोबत सैफच्या नव्या घरी त्यांच्या बाळाला पाहायला गेले होते.अर्जुन व मलायकाची एन्ट्री होताच सैफिनाच्या घराबाहेर उभे असलेले फोटोग्राफर्स अॅक्शन मोडमध्ये आले. कॅमेरे घेऊन पुढे सरसावले.
अर्जुन व मलायका कारबाहेर निघाले. याचदरम्यान घराबाहेर उभ्या असलेल्या एका फोटोग्राफर्सने भींतीवर चढण्याचा प्रयत्न केला. भींतीवर चढून फोटो घेण्याचा आटापीटा करू पाहणा-या या फोटोग्राफरला पाहून अर्जुनचा पारा चढला. आधी त्याने त्याला खाली उतरण्याची विनंती केली.
https://www.instagram.com/p/CL2APAkF1WA/?utm_source=ig_web_copy_link
तुम्ही बिल्डींगच्या आता असे येऊ शकत नाही. हे चूक आहे. विनंती आहे ही तुम्हाला, असे अर्जुन म्हणाला. पण तरीही फोटोग्राफर भींतीवर चढण्याचा प्रयत्न करू लागला. ते पाहून मात्र अर्जुनचा पारा चढला. तुम्ही ऐकतच नाही आहात? असे म्हणून तो पुढे सरकरला आणि त्या फोटोग्राफर्सवर चांगलाच भडकला.
महत्वाच्या बातम्या
- राठोडांवरील आरोपांवर इतके दिवस ठाकरेंनी शांत बसणं म्हणजे केवळ सत्तेची लालसा – भाजप
- इंधन दरवाढ…हा तर केंद्र सरकारचा सामान्यांच्या खिश्यावर दिवसाढवळ्या डल्ला
- काँग्रेसवर जेव्हा आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले – नाना पटोले
- ‘ठाकरे सरकारचे तोंड काळे झाल्यानंतर गबरूचा राजीनामा घेतला’
- देशभरातील क्षत्रिय समाजातील गरिबांना 15 टक्के आरक्षण द्या; आठवलेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
