मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. शेतकरी, मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल, संजय राठोड यासारख्या अनेक मुद्द्यांनी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. विरोधकांचे मुद्दे त्यांनी शांतपणे मांडावेत, गोंधळ करु नये. विरोधकांनी मांडलेल्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा होईल, गोंधळाने काहीही साध्य होणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी घेतली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणानं विधिमंडळाचं कामकाज सुरु झाले आहे. राज्यपालांनी कोरोना योद्ध्यांना अभिवादन करत अभिभाषणाला सुरुवात केली. महाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सव यावर्षी साजरा केला जाणार आहे. धारावीसारख्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये राज्य शासनानं प्रभावी काम केले आहे. राज्य सरकारनं कोरोना संदर्भात मदतीसाठी कोरोना टास्क फोर्स स्थापन केले. आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. कोरोना चाचणी साठी प्रयोगशाळा वाढवण्यात आल्या आहेत. अस राज्यपाल आपल्या अभिभाषणात म्हणाले आहेत.
तर, महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली. माझे कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम ठरला. कोरोना विरुद्धची लढाई सुरु असून राज्य सरकारनं मी जबाबदार ही योजना सुरु केलीय. कोरोना संदर्भातील आरोग्य संदर्भातील उपाययोजना वाढवण्याची गरज आहे. दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. नंदुरबार येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात आले. राज्यात 500 प्रयोगशाळा सुरु आहेत. अस देखील राज्यपाल म्हणाले आहेत.
तर, राज्यपालांकडून अभिभाषणात केंद्र सरकारकडून मिळालेल्या आणि येणे बाकी वस्तू व सेवा कराच्या परताव्याची माहिती जाहीर केली गेली. शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी विक्रमी खरेदी केली. राज्य सरकारनं धान उत्पादकांच्या खात्यात रक्कम जमा केली. राज्य सरकारनं कोरोना प्रादुर्भाव असल्यानं अंगणवाडीत न येऊ शकणाऱ्या बालकांना आणि गर्भवती मातांना घरपोहोच शिदा पुरवला आहे. शाळा बंद पण शिक्षण सुरु हा उपक्रम राबवण्यात आला. अस राज्यपाल आपल्या अभिभाषणात म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे अधिवेशन सुरु होण्याआधी शरद पवारांच्या भेटीला
- गर्लफ्रेंडचा फोटो काढत असलेल्या फोटोग्राफरवर भडकला बॉयफ्रेंड अर्जुन; अर्जुनला पाहून मलायका झाली स्तब्ध
- हिंगोली जिल्ह्यात आजपासून ७ मार्चपर्यंत संचारबंदी लागू; एसटीही बंद
- संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
- आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; राठोड, मुंडेंच्या मुद्द्यावरून विरोधक सभागृह दणाणून सोडणार ?


