Share

वाढदिवसादिवशी ‘हा’ क्रिकेटर हॉस्पिटलमध्ये ; कोरोना झाल्यामुळे करावं लागलं दाखल

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : भारताचा माजी भारतीय क्रिकेटपटू सलील अंकोला आज आपला ५३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. पण दुर्देवाने वाढदिवसाच्या एक दिवसआधी ते जागतिक महामारी कोविड-१९ च्या विळख्यात सापडले. यामुळे त्यांना सध्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याची माहिती त्यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.

रुग्णालयातील आपला फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, ‘उद्या माझा वाढदिवस आहे आणि आज कोरोना महामारीच्या कचाट्यात सापडलो आहे. अविस्मरणीय वाढदिवस. या महामारीचा सामना करणे कठीण आहे. परंतु मला तुम्हा सर्वांच्या प्रार्थनेची गरज आहे. मी लवकरच पूर्णपणे बरा होऊन परत येईल.’

https://www.instagram.com/p/CL1tshMpgtw/?utm_source=ig_web_copy_link

सलील यांनी भारताकडून २० वनडे सामने खेळले आहेत. यात त्यांनी ४७.३० च्या सरासरीने १३ विकेट्स घेतल्या आहेत. त्यांचा १९९६ मध्ये झालेल्या विश्वचषकातही समावेश होता. त्यानंतर त्यांनी १९९७ मध्ये २८ वर्षांचे असतानाच अभिनय क्षेत्रात जाण्यासाठी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. यानंतर सलीलनी टीव्ही मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांची ‘शss कोई हैं’ तसेच ‘विक्राल और गब्राल’ मधील विक्रालची भूमीका चांगली गाजली होती. तसेच त्यांनी काही चित्रपटातही काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!