Share

‘पति पत्नी और वो’ ; धनश्रीने शेअर केलेला फोटो चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा स्पीनर युजवेंद्र चहलच्या बायकोने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. धनश्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. नेहमीच सोशल मीडियावर तिचे डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. धनश्री तिच्या उत्तम डान्समुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. आता पुन्हा या फोटोमुळे धनश्री पुन्हा चर्चेत आली आहे.

धनश्रीने केलेल्या फोटोत विराट कोहली, स्वत: धनश्री आणि युजवेंद्र दिसून येत आहे. हा फोटो शेअर करत धनश्रीने लिहिले कि, ‘हा फोटो कर्णधार कोहली आणि स्पिनर चहलसोबत…. नाश्त्यादरम्यान मजेदार गोष्टीपासून ते मॅचनंतरच्या मस्तीपर्यंत…. प्रत्येक क्षण आनंदाचा होता, आमच्यामध्ये अनेक प्रसंग चर्चिले गेले, एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना सांगितल्या…!’, असं कॅप्शन धनश्रीने या फोटोला दिलं आहे. हा फोटो चर्चेत येण्याचं कारण म्हणजे धनश्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये धनश्री आणि युजवेंद्रच्या बरोबरमध्ये विराट कोहली थांबला आहे. या नवराबायकोच्यामध्ये विराट कसा काय थांबला, नेमकं काय औचित्य होतं? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.

https://www.instagram.com/p/CPKhNGlFHRS/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, चहलच्या आई बाबांना कोरोनाची बाधा झाली होती तर धनश्रीच्या आई आणि भावाला देखील कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता दोघांच्याही कुटुंबातले सदस्य ठीक आहेत. घरातील सदस्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे युजवेंद्र आणि धनश्रीने सुटकेचा निश्वास सोडलाय. सगळं ठीक झाल्यानंतर पुन्हा एकदा दोघेजण सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!