Share

व्यापाऱ्यांना अँटिजन टेस्ट बंधनकारक पण सरकारी कर्मचाऱ्यांचे काय?

Published On: 

बीड: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी १३ मार्च पर्यंत सर्व व्यापाऱ्यांना अँटिजन टेस्ट करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहे, अन्यथा गंभीर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांना ठरवून दिलेल्या दिवशी ग्रामीण रुग्णालय पाटोदा, प्राथमिक आरोग्य केंद्र अमळनेर, डोंगरकिन्ही, नायगाव तसेच वाहिली या ठिकाणी अँटिजन टेस्ट करून घेण्यासाठी सांगितले आहे.

रुग्ण संख्येत होत असलेली वाढ बघून जगताप यांनी तीन आदेश सोमवारी संध्याकाळ पासून लागू केले आहेत. यात सर्वात महत्वाचं म्हणजे १३ मार्च पर्यंत जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना टेस्ट करून घेणे बंधनकारक आहे. दुसरा आदेश असा की महाशिवरात्रीनिमित्त प्रत्येक गावात दहा फुटाचे अंतर ठेऊन फराळ विक्री करण्याची मुभा आणि तिसरा आदेश असा की जिल्हा कारागृहातील कैद्यांना नातेवाईक व वकील यांच्या भेटीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

लोकांच्या सातत्याने संपर्कात येऊ शकणारे असे सर्वच व्यापारी, दुकानदार, हॉटेल चालक, चहा विक्रेते तसेच बँक कर्मचाऱ्यांना देखील टेस्ट करणे अनिवार्य आहे. अँटिजन टेस्ट न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. प्रश्न असा आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना टेस्ट करून घेणे बंधनकारक का नाहीये ? ते सुद्धा लोकांच्या संपर्कात येतात. अनेक सरकारी कार्यालये आहेत जिथे सतत लोकांची ये-जा असते. पण मग त्यांना वेगळे नियम आणि सामान्य लोकांना वेगळे नियम असे का ? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होत आहेत.

बीड जिल्ह्यात ८९ नवे रुग्ण निष्पन्न झाले आहेत तर ४३ कोरोनामुक्त झाले आहेत. आता एकूण कोरोना बाधितांची संख्या १९ हजार ४३५ इतकी असून त्यातील १८ हजार ३७७ जण कोरोनामुक्त झाले आहेत तसेच ५८८ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पी.के. पिंगळे यांनी दिली आहे

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!