Share

स्वच्छतागृह नसलेल्या शाळांवर सीईओ करणार कारवाई

Published On: 

परभणी :  जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खासगी, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळांमध्ये अत्यावश्यक सुविधा आढळून न आल्यास त्यांच्यावर शिक्षणाचा अधिकार अंतर्गत कारवाई होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिली. यासाठी त्यांनी संबंधित विभागांना आदेश देखील काढलेले आहेत.

खासगी, विना अनुदानित आणि स्वयं अर्थसहाय्यीत शाळांसाठी जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकार्‍यांची तपासणी पथके तयार केली आहेत. ती सर्व शाळांची माहिती एकत्रित करणार आहेत, असेही टाकसाळे यांनी म्हटले आहे. परभणी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या हेतूने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी टाकसाळे हे प्रयत्न करत आहेत. शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत सर्वच शाळांमध्ये स्वच्छतागृहे, मुतारी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, खेळाचे मैदान, आवार भिंत, स्वयंपाकगृह, उताराचा रस्ता, वर्गखोल्या, ब्लॅक किंवा ग्रीन बोर्डाची सुविधा, विजेची सुविधा, अग्निशमन यंत्र, वैद्यकीय प्रथम उपचार पेटी आदी सारख्या अत्यावश्यक सुविधा आवश्यक असणार आहेत.

या  शाळांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषद शाळेसाठी दिनांक ५ मार्च 2021 ते 20 मे 2021 या कालावधीमध्ये तर 5 मार्च 10 जून या दरम्यान खासगी शाळांना अत्यावश्यक सुविधांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या कडे माहिती पाठवणे गरजेची असणार आहे. तसेच ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसारच या सुविधांच्या उपलब्धते बाबत कार्यवाही करणे देखील अपेक्षित असणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!