Share

पतीची आत्महत्या, पत्नीचाही उपचारासाठी नेताना मृत्यू

Published On: 

परभणी : जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कळगाव येथील व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नंतर त्यांच्या पत्नीचा देखील मृत्यू झाला आहे. या मृत दांपत्याचा विवाहाला अजून एक वर्षही पूर्ण झाले नव्हते.

मिळालेल्या माहितीनूसार, पूर्णा तालुक्यातील कळगाव येथील मोतीराम देवकते (२६) यांचा गतवर्षी मे महिन्यात ताडकळस येथील श्यामबाला यांच्याशी विवाह झाला होता. गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दोघेही घरातून बाहेर न आल्याने घरातील व्यक्तींनी दार वाजवले. पण आतून प्रतिसाद न आल्याने दार तोडावे लागले. यावेळी मोतीराम हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. तर त्यांची पत्नी श्यामबाला देवकते या बेशुद्धावस्थेत आढळल्या. कुटुंबियांनी तत्काळ शामबाला यांना ताडकळस येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

परंतु, तेथील डॉक्टरांनी परभणी येथे पुढील उपचारासाठी हलवण्याचे सांगितले. परभणी येथे उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच शामबाला यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मोतीराम देवकते यांनी आत्महत्या का केली, शामबाला बेशुद्ध का झाल्या याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!