मुंबई : तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीपासून हे वादळ बरेच दूर असून आज रात्री किंवा उद्या या वादळाचा प्रभाव किनारपट्टी भागात जाणवू शकतो, असे सांगण्यात येत आहे. राज्यातील किनारपट्टी भागातील जिल्ह्यांत जोरदार वारे वाहण्याची तसेच मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळाचा तडाखा केरळ, तामिळनाडूमध्ये जाणवण्यास सुरूवात झाली आहे. केरळमधील किनारपट्टी भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक घरांचे नुकसान झाले आहे. झाडे कोसळली असून, अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. केरळातील मालापूरम कोझीकोडे, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिरुवनंतपुरुम येथील जुन्या पुलाला किनाऱ्यावर येऊन आदळणाऱ्या लाटांचा तडाखा बसला आहे. ६० वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या वलियाथुरा येथील पुलाचे नुकसान झाले आहे. समुद्राच्या लाटा आदळत असल्यामुळे पुलाला तडे गेले आहेत. मागे काही दिवसांपूर्वी झालेल्या पुलाचे नुकसान झालेले होते. पुल वाकला असून, त्यामुळे पुलाकडे जाणारे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
കടലാക്രമണത്തില് കാസര്ഗോട്ടെ വീട് നിലംപൊത്തിയപ്പോള്…
ടൗട്ടെ ചുഴലിക്കാറ്റിന്റെ പ്രഭാവത്തിൽ കേരളത്തിൽ വ്യാപകമായി അതിതീവ്രമായ മഴ, സംസ്ഥാനത്തെ ഒമ്പത് ജില്ലകളിൽ റെഡ് അലർട്ട്.
വാര്ത്തകള് വിശദമായി: https://t.co/wgpU2mFRbr#CycloneTauktae #CycloneAlert #KeralaRains pic.twitter.com/AdgLAyCD6W
— IE Malayalam (@IeMalayalam) May 15, 2021
तसेच आता केरळमध्ये वाऱ्याचा वेग वाढला असून, किनारपट्टी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमधील मालपूरम, कोझीकोडे, वायनाड, कन्नूर आणि कासरगोड या पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिवृष्टी या पाच जिल्ह्यात होण्याचा इशारा वर्तवण्यात आला असून, सध्या वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला आहे.
दरम्यान, मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर यांसह कोकण किनारपट्टीवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईत आज आणि उद्या पर्जन्यवृष्टीसह वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे यंत्रणा सतर्क आणि सुसज्ज ठेवण्यात आली आहे. गोवा आणि कोकण किनारपट्टीपासून सध्या हे वादळ साडेतीनशे किलोमीटर अंतरावर आहे. गोवा रत्नागिरी-सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट तर अन्य समुद्र किनार्यावर यल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ‘तौत्के’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनेही जोरदार तयारी केली आहे. पालिकेने यंत्रणा सज्ज केली आहे. समुद्र किनाऱ्यावरील वस्त्या निर्मनुष्य करण्याचं काम सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पालकमंत्र्यांनी बारामतीच्या इनामदारीचा पट्टा काढून सोलापूरकरांची सेवा करावी’
- स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटनखाना चालवणारा गजाआड
- गावागावात जा, घरोघरी जा आणि कोरोनाच्या टेस्ट करा ; मोदींचे आदेश
- कपील शर्माची सुमोन १० वर्षापासुन लढत आहे ‘या’ आजाराशी
- इंदापूरला नेण्यात येणारे पाणी रद्द करा;अन्यथा…; नारायण पाटलांचा निर्वाणीचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

