सोलापूर- सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातून ५ टी.एम.सी. पाणी इंदापूरला नेले असून या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील स्वाक्षरी झाली आहे. इंदापूरकरांसाठी हा ऐतिहासिक निर्णय असल्याच्या बातम्या सोलापूर जिल्ह्यात धडकल्या आणि याच निर्णयाविरोधात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली. पालकमंत्री भरणे यांच्या या सोलापूर जिल्ह्यावरील अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले आहेत.
यातच आता भाजपने भरणे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. सांडपाण्याच्या गोंडस नावाखाली उजनीतील 5 टीएमसी पाणी इंदापूरला पळवण्याचा घाट घातला गेला आहे, अशी टीका करत, बारामतीच्या इनामदारीचा गळ्यातील पट्टा काढून सोलापूरकरांची सेवा करावी, असा प्रहार भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दत्तात्रय भरणे यांच्यावर केला आहे. भविष्यात सोलापूर जिल्ह्यातील ऊस, फळबागा शेती उद्ध्वस्त करून जिल्ह्याचे वाळवंट करण्याचा पालकमंत्र्यांचा डाव असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.
दुसऱ्या बाजूला करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे देखील आक्रमक झाले आहेत. उजनी धरणावरील भीमा प्रकल्प व इतर विविध योजनांच्या पाणी वापराचा तपशील पाहिल्यास उजनीतून आता नवीन प्रस्तावांना मंजुरी देऊन पाणी देणे हि बाब करमाळा तालूक्यासह सोलापुर जिल्ह्यावर अन्याय करणारी आहे. इंदापुरला नियोजित उपसा सिंचन योजनेस पाणी देणे बाबतचा निर्णय तातडीने रद्द करा अन्यथा मराठवाड्यासाठी उजनीतुन चालू असलेल्या कृष्णा-मराठवाडा सिंचन योजनेचे काम बंद पाडण्यात येईल, असा इशारा माजी आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘देश फक्त 6 महिन्यांसाठी पुन्हा एकदा डॉ. मनमोहन सिंगांच्या हाती द्या’
- जगनमोहन रेड्डींचा जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या खासदाराला अटक
- ये पब्लिक है, सब जानती है! देवेंद्र फडणवीस यांचे आता थेट सोनिया गांधींना पत्र
- ‘लसीकरण बंद करण्याबाबतचे आरोग्यमंत्र्यांचे ‘ते’ विधान म्हणजे खोटारडेपणाचा कळस’
- गावागावात जा, घरोघरी जा आणि कोरोनाच्या टेस्ट करा ; मोदींचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

