परभणी : देशातील 7 राज्यामध्ये पक्ष्यांच्या मृत्यूने एकाच खळबळ उडाली आहे. तर आतापर्यंत चार राज्यात बर्ड फ्लूचा संसर्ग आढळून आला आहे. यामुळे जम्मू-काश्मीर, तामिळनाडूसह महाराष्ट्रामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. देशातील चार राज्यात बर्ड फ्लूची नोंद झाली असून हिमाचल, मध्य प्रदेश, राजस्थान आणि केरळमध्ये बर्ड फ्लूचा हैदोस पाहायला मिळत आहे. तसेच कर्नाटक, गुजरात आणि हरियाणामध्येही पक्ष्यांच्या मृत्यूने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात देखील अनेक पक्ष्यांचा होणार मृत्यू ही चिंतेची बाब आहे. मृत पक्षांच्या शवविच्छेदन अहवालामध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग आढळला नसल्याने काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, अशातच आता परभणीत ५०० ते ६०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. ५ किलोमीटर परिसरातील शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या कोंबड्यांच्या मृत्यूमागचं गूढ अद्याप कायम असून शवविच्छेदनअहवालानंतरच कारण निष्पन्न होऊ शकते. दुसरीकडं, हरियाणामधील पंचकुला येथे मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यूने थैमान घातले आहे. पंचकुला जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत चार लाख पोल्ट्री पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जालंधर व भोपाळ येथे तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले आहेत. बर्ड फ्लूने केरळमध्ये आपत्ती जाहीर केली आहे. तसेच बर्ड फ्लू मुळे 30 हजाराहून अधिक कोंबड्या व बदकांची हत्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ नेत्याची उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी , मात्र शरद पवारांनी आपलंसं केलं
- शिवसेनेच्या खासदाराने केला छत्रपती संभाजी महाराजांचा ‘एकेरी’ उल्लेख
- बॉम्बेचं मुंबई झालं मग औरंगाबादचं संभाजीनगर का नाही ? उदयनराजे कडाडले
- शेतकऱ्यांनी दिला ‘जिंकू किंवा मरू’चा नारा; सरकार-शेतकरी यांच्यातील आठवी फेरी देखील निष्फळ
- कंगनाने पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोप धुडकावले !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

