Share

बॉम्बेचं मुंबई झालं मग औरंगाबादचं संभाजीनगर का नाही ? उदयनराजे कडाडले

Published On: 

🕒 1 min read

सातारा : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.

महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने नामांतराला विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं. नामांतराबाबत भाजपसह मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं संभाजीनगर असं नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावं असं आव्हानच देण्यात आलं आहे.

या वादावर अनेक नेते रोज प्रतिक्रिया देत आहेत. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘बॉम्बेचं मुंबई झालं मग औरंगाबादचं संभाजीनगर का नाही ? राजेशाही असती तर माझं मत व्यक्त केलं असतं’, असं भाष्य त्यांनी केलं आहे.

दरम्यान,पोवई नाका येथील ग्रेडसेप्रेटरचे काम पूर्ण झाले असून मान्यवरांच्या हस्ते उदघाटन राखडल्यामुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. हे समजताच उदयनराजेंनी पाहणी करून अचानक छत्रपती संभाजी महाराज असं नाव असलेल्या या ग्रेडसेप्रेटरचं उदघाटन करून हा मार्ग सामान्यांसाठी खुला करून दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!