Share

शिवसेनेच्या खासदाराने केला छत्रपती संभाजी महाराजांचा ‘एकेरी’ उल्लेख

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही.

महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने नामांतराला विरोध असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेची कोंडी झाल्याचं दिसून आलं. नामांतराबाबत भाजपसह मनसेने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं संभाजीनगर असं नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावं असं आव्हानच देण्यात आलं आहे.

या वादावर अनेक नेते रोज प्रतिक्रिया देत आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांनी एकेरी उल्लेख केला आहे. त्यामुळे आता त्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. एकीकडे छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव औरंगाबादला देण्यासाठी शिवसेना आग्रही असताना त्याच शिवसेनेतील महिला खासदाराने संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणे ही वाईट घटना आहे.

यासंदर्भात भाजप नेते निलेश राणे यांनी एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘या शिवसेनेच्या खासदार ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा फक्त संभाजी म्हणून उल्लेख केला. ज्यांना धड संभाजी शब्दाचा उच्चार करता येत नाही, मला शंभर टक्के खात्री आहे यांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास देखील माहीत नसेल. नावाचा उच्चार पण मोगलांसारखा करतात ही लोकं’, अशी टीका देखील निलेश राणेंनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!