मुंबई : वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्री कंगना रणौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने असे म्हटले आहे की, हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला आहे.
या याचिकेवर सुनावणी होवून न्यायालयाने कंगना विरोधात राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणे या कलमांखाली गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. गुन्हा दाखल केल्यानंतर वांद्रे पोलिसांनी कंगनाला आधी दोन वेळा नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावल होते. मात्र, वैयक्तिक कारणास्तव ती चौकशीसाठी हजर झाली नव्हती.
यानंतर पोलिसांनी तिला तिसरी आणि अंतिम नोटीस बजावली होती. राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आल्यानंतर कंगना व तिची बहीण रंगोली जबाब नोंदवण्यासाठी आज वांद्रे पोलीस स्थानकात हजर झाल्या होत्या. पोलिसांनी तब्बल २ तास त्यांचा जबाब नोंदवून घेतला. ‘आपण केलेले ट्वीट काही गैर नाही, ट्विटर हे एक सोशल मीडिया प्लेटफॉर्म आहे, त्यामुळे तिथे अनेक ट्विट केले जातात माझ्या ट्वीटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, असं मला वाटत नाही’ असं उत्तर तिने पोलिसांना जबाबत दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अखेर ठरले! यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘या’ ठिकाणी होणार
- संभाजीनगर’ हा भावनिक मुद्दा नसून; आमच्या हिंदू अस्मितेचा – अंबादास दानवे
- हे कसले आपडो सरकार, हे तर थापडो सरकार; भाजप नेत्याची बोचरी टीका
- अजून काय मागणार… सोनू सूद साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत
- सावधान ! कोरोना लसीसाठी ऍप डाऊनलोड करू नका आरोग्य विभागाची सूचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

