🕒 1 min read
मुंबई : काही महिन्यांपूर्वी शिवसेनेच्या सहा नगरसेवकांनी आमदार निलेश लंकेंच्या पुढाकाराने व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. महाविकास आघाडीतील पक्षाने आपल्याच मित्रपक्षाला सुरुंग लावण्याची ही पहिली वेळ होती. यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे त्या नगरसेवकांना पुन्हा घरवापसी करावी लागली होती. याचीच पुनरावृत्ती घडण्याची शंका येताच उद्धव ठाकरे यांनी कठोर पाऊल उचललं आहे.
सोलापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते व शिवसेना नगरसेवक महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी केल्याची माहिती, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली. यानंतर, कोठे यांचा प्रवेश लांबण्याची शक्यता होती. मात्र, अखेर खुद्द शरद पवारांच्याच उपस्थितीत महेश कोठे हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.
या प्रवेशाबाबत शरद पवार यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून माहिती देण्यात आली आहे. ‘सोलापूर शहर हे विविधतेनं नटलेलं शहर आहे. या शहराचा विचार हा गांधी, नेहरू, इंदिरा गांधी यांच्या विचारांचा होता. मात्र मध्यंतरी भाजपाच्या विचाराने प्रेरित वर्गामुळे सोलापूरचा चेहरा बदलला. हे चित्र पुन्हा बदलण्यासाठी महेश कोठे तसेच अन्य सहकाऱ्यांनी लक्ष घातले आहे. कोठे व त्यांचे सहकारी सार्वजनिक जीवनात लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटत असतात. यांची सामूहिक शक्ती प्रगत विचाराला मदत करणारी आहे.’ अशी स्तुतीसुमने देखील पवार यांनी उधळली आहेत. त्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर कोठेंना शरद पवार यांनी मात्र लगेचचं आपलंसं केलं आहे.
श्री. कोठे व त्यांचे सहकारी सार्वजनिक जीवनात लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी झटत असतात. यांची सामूहिक शक्ती प्रगत विचाराला मदत करणारी आहे. pic.twitter.com/oyoU16dfAB
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 8, 2021
महत्वाच्या बातम्या
- अखेर ठरले! यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘या’ ठिकाणी होणार
- संभाजीनगर’ हा भावनिक मुद्दा नसून; आमच्या हिंदू अस्मितेचा – अंबादास दानवे
- हे कसले आपडो सरकार, हे तर थापडो सरकार; भाजप नेत्याची बोचरी टीका
- अजून काय मागणार… सोनू सूद साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत
- कंगनाने पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोप धुडकावले !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

