नवी दिल्ली : केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचं आंदोलन कडाक्याची थंडी आणि अवकाळी पावसातही सुरूच आहे. याच दरम्यान केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात आज पुन्हा एका बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं.
आंदोलनकर्ते शेतकरी आणि सरकार यांच्यातील ही आठवी बैठक होती. या बैठकीमध्ये तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, आजची चर्चा देखील निष्फळ ठरल्याचे समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अद्यापही तोडगा निघालेला नसून पुढील बैठकीत तोडगा निघेल असा विश्वास बठकीला उपस्थित केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत पुन्हा एकदा सरकारने शेतकरी नेत्यांसमोर कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव ठेवला. सरकारकडून असे म्हटले होते की हा कायदा मागे घेता येणार नाही कारण बरेच शेतकरी त्यास अनुकूल आहेत. तर कायदा रद्द करण्याची मागणी शेतकरी नेते वारंवार करत राहिले. या बैठकीवेळी एका शेतकरी नेत्याने ‘जिंकू किंवा मरू’ अशा संदेशाचा फलक देखील झळकावला.
दरम्यान, आज सलग 44 व्या दिवशीही शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आठव्या फेरीची बैठक आज झाली. ही बैठक देखील निष्फळ ठरली. आता पुढील बैठक 15 जानेवारीला होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ नेत्याची उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी , मात्र शरद पवारांनी आपलंसं केलं
- शिवसेनेच्या खासदाराने केला छत्रपती संभाजी महाराजांचा ‘एकेरी’ उल्लेख
- हे कसले आपडो सरकार, हे तर थापडो सरकार; भाजप नेत्याची बोचरी टीका
- नाशिकमध्ये यंदाचे मराठी साहित्य संमेलन, भुजबळ यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
- कंगनाने पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोप धुडकावले !


