Share

भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता, काँग्रेसमध्ये घरवापसीसाठी अनेकांचे प्रयत्न सुरू- थोरात

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:-  एकनाथ खडसे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून आज मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी खडसेंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. नुकतंच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी इतके वर्ष पक्षासाठी काम केले. पण पक्षाने त्यांची दखल घेतली नाही. तसेच भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तिथे गेलेले अनेक जण परत यायचा प्रयत्न करत आहेत, असा गौप्यस्फोट थोरात यांनी केला आहे.

एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. थोरात यांनी खडसे यांच्या निर्णयाचे स्वागत केले असून ते पुढे म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी अनेक वर्ष भाजप पक्षासाठी काम केले. पण पक्षाने त्यांची दखल घेतली नाही. त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे. तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा देऊ. याबाबत पंचनामे सुरु आहेत. त्यामुळे कागदोपत्री आल्यावर मदत करावी लागते. शेतकऱ्यांना चांगला दिलासा द्यायचा प्रयत्न करु, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

तसेच राज्यातील भाजपचे नेते शेतकऱ्यांना मदतीच्या मोठमोठ्या मागण्या करत आहेत, पण केंद्र सरकारकडे असलेले जीएसटीचे ३० हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मिळावेत यासाठी प्रयत्न करत नाहीत. त्यांनी पोकळ गप्पा मारण्यापेक्षा जीएसटीचे पैसे आणावेत तसेच राज्याला केंद्र सरकारकडून मोठी आर्थिक मदत मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्याकडे प्रयत्न करावा, असे थोरात म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!