Share

कॉंग्रेसमध्येही सुरु झाली जेष्ठ नेत्यांची हेटाळणी; सिब्बलांना चौधरींनी दिला पक्ष सोडण्याचा सल्ला

Published On: 

नवी दिल्ली- बिहार विधानसभा निवडणूकीमध्ये एनडीए 125 जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाली. तर महाआघाडी 110 जागाच जिंकू शकली. ‘मोदी मॅजिक’ने तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंग केले. निवडणुकीत भाजपाने 74 जागांवर विजय नोंदवला, तर जेडीयूला 43 जागा मिळाल्याने आणि राजदने 75 जगांवर विजय संपादन केला, परंतु त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसला अवघ्या 19 जागा मिळाल्या.

यावरच काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेसवर टीका करत, लोकांना आमच्याकडून अपेक्षा उरलेल्या नाहीत. काँग्रेस नेतृत्वाला बिहारचा पराभव सामान्य वाटत असावा असे म्हणत आहेत. कपिल सिब्बल यांनी द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, केवळ बिहारच नाही तर देशातील ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या तेथील जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. काँग्रेसला गुजरातच्या पोटनिवडणुकीत एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. तर तीन ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे.

गुजरातमध्येही लोकसभा निवडणुकीत हेच घडले होते. तर काँग्रेसच्या उमेदवारांना उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतही काही ठिकाणी दोन टक्के मते मिळाल्यामुळे जनमताचा संदेश स्पष्ट आहे की त्यांनी आपल्याला नाकारल्याचे कपिल सिब्बल म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजपमध्ये जेष्ठ नेत्यांची हेटाळणी होत असल्याची टीका नेहमीच कॉंग्रेसकडून करण्यात येत असते मात्र आता कॉंग्रेसमध्येही जेष्ठ नेत्यांची हेटाळणी सुरु झाली असल्याचे चित्र आहे. पक्षाला आरसा दाखवणाऱ्या सिब्बल यांना थेट पक्ष सोडण्याचा सल्ला कॉंग्रेस नेते देवू लागले आहेत. ज्यांना काँग्रेस पसंत नसेल त्यांनी दुसऱ्या पक्षात जावे किंवा नवा पक्ष काढावा, असा सल्ला काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन यांनी कपिल सिबल यांना दिला.

अधीर रंजन चौधरी यांनी कपिल सिब्बल यांना टोला लगावताना काही न करताच बोलणं याला आत्मपरिक्षण म्हणायचं का? असा प्रश्न विचारला आहे. ‘कपिल सिब्बल यांनी यापूर्वीही असंच मत व्यक्त केलं होतं. ते काँग्रेस पक्ष आणि आत्मपरिक्षणाच्या मुद्द्यावर खूप चिंतित आहेत. पण आम्ही त्यांना बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात निवडणुकीत कुठेच पाहिलं नाही’, असा टोला चौधरी यांनी सिब्बल यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!