Share

HSC Result 2022: बारावीचा निकाल उद्या, जाणून घ्या कसा चेक कराल…

Published On: 

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे इयत्ता ( HSC Result 2022 ) 12वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. महाराष्ट्र बोर्ड उच्च प्रमाणपत्र (HSC) किंवा इयत्ता 12वी निकालाची तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्र बोर्ड उद्या, 08 जून रोजी उच्च माध्यमिक निकाल जाहीर करणार आहे.

निकाल कधी जाहीर होईल-

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या, 8 जूनला दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. निकाल अधिकृत वेबसाइट https://www.mahahsscboard.in/ वर जाहीर केला जाईल. महाराष्ट्र बोर्ड उच्च माध्यमिक प्रमाणपत्र किंवा 12वी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती.

या परीक्षेत सुमारे 14 लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. गेल्या वर्षी इयत्ता 12वीची उत्तीर्णता 99.63 टक्के होती. गेल्या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी 12 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 2021 मध्ये कोरोना महामारीमुळे परीक्षा घेण्यात आली नव्हती. अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले होते.

असा चेक करा निकाल-

MSBSHSE पुणे उद्या त्यांच्या अधिकृत वेबसाइट https://www.mahahsscboard.in/ आणि https://mahresult.nic.in/ वर निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र उच्च प्रमाणपत्र (HSC) किंवा इयत्ता 12वीचे निकाल ऑनलाइन पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी खालील सुचना लक्षात घ्याव्या.

1. अधिकृत वेबसाइट https://www.mahahsscboard.in/ किंवा https://mahresult.nic.in/ ला भेट द्या.
2. मुख्यपृष्ठावर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
3. तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
4. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
5. तपासा आणि प्रिंटआउट घ्या.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!