Share

IPL 2022: डु प्लेसिस – कोहलीच्या धुव्वादार बॅटिंगने पंजाबचे गोलंदाज गार; २०६ धावांचा डोंगर सर करावा लागणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएलच्या १५ व्या मोसमातील डबल हेडर मधला दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अग्रवालने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या आरसीबीच्या संघाने धावांचा पाऊस पडला आहे. आजी आणि माजी कर्णधार फाफ आणि कोहलीने मिळून १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. तसेच १५व्या हंगामातील पहिला २०० स्कोर आरसीबीकडून आला.

या सीजनमध्ये कर्णधार फाफने (Faf du plessis) विराटला (virat kohli) ३ऱ्या स्थानावर पाठवले तर तो स्वतः सलामीला उतरला. अगदी सुरुवातीपासूनच आरसीबीच्या फलंदाजांनी आक्रमक कामगिरी केली. ज्यात कर्णधार फाफने कॅप्टन्स इनींग्ज करत शानदार अर्धशतक ठोकले. फाफने ५७ चेंडूत ८८ धावा केल्या ज्यात ३ चौकर आणि ७ षटकारांचा समावेश होता. तसेच त्याने यावेळी आयपीएलमध्ये ३००० धावा पूर्ण केल्या. फाफला जोडीला विराट कोहली सुद्धा फॉर्ममध्ये दिसला.

फाफ ८८ धावांवर बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिकने स्ट्राईक सांभाळली. नवीन नियमाप्रमाणे नवीन खेळाडू स्ट्राईक घेईल. कार्तिकनेही येताच फाफचा सूर लावत फटकेबाजी सुरु केली. त्याने केवळ १४ चेंडूत धमाकेदार ३४ धावांची खेळी केली. डी वाय स्टेडियमवर या सामन्यात पहिल्याच डावात १४ षटकार दिसले. आता आरसीबीच्या वादळानंतर पंजाब संघाला २०६ धावांचा मोठा डोंगर सर करावा लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!