🕒 1 min read
मुंबई: आयपीएलच्या १५ व्या मोसमातील डबल हेडर मधला दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अग्रवालने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब आणि बँगलोरची धुरा नवीन कर्णधार सांभाळत आहेत. मयंक आणि फाफ डु प्लेसिस पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधारपद निभावत आहेत.
पंजाब आणि बँगलोरचा (RCB vs PBKS) हा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जात आहे. तिथे यापूर्वी काही आयपीएल खेळांचे आयोजन केले आहे. काही खेळांमध्ये संघांनी मोठी धावसंख्या उभारली. डी.वाय.पाटील हे देखील मुंबईतच असल्याने वानखेडे स्टेडियमसारखीच खेळपट्टी आहे. त्यामुळे इथे फलंदाजांचा दबदबा दिसू शकतो. या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना सरासरी धावसंख्या १८० ते १७५ पर्यंत असते.
दोन्ही संघाचे प्लेइंग इलेव्हन:
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर – फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, अनुज रावत, फिन ऍलन, दिनेश कार्तिक, महिपाल लोमोर्ड, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, शाहबाज अहमद, शेरफान रदरफोर्ड, मोहम्मद सिराज.
पंजाब किंग्स – शिखर धवन, मयंक अग्रवाल, लियाम लिव्हिंगस्टोन, प्रभासिमरानी, शाहरुख खान, ओडियन स्मिथ, भानुका राजपक्षे, हरप्रीत ब्रार, नॅथन अलिसो, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
महत्वाच्या बातम्या
- “आम्ही त्यांच्या नाकावर टिच्चूनच काम करणार”- गोपीचंद पडळकर
- “कडुलिंबाच्या बिया पेरायच्या…”- सदाभाऊ खोत यांचा राष्ट्रवादीला टोला
- IPL 2022: मुंबईच्या पलटणसाठी खुशखबर ; ‘हा’ स्टार खेळाडू पुढच्या सामन्यात संघात परतणार!
- ‘या’ मंत्र्यांवर मुंबई पोलीस गुन्हा दाखल करणार का?- मोहित कंबोज यांचा सवाल
- IPL 2022: दिल्लीचे निवडीबाबत अजब निर्णय; इतिहासात दुसऱ्यांदाच खेळतेय ‘अशी’ प्लेइंग इलेव्हन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
