पुणे : आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. अनेक ठिकाणी होम आयसोलेशन म्हणजेच घरीच विलगीकरणात असलेले कोरोना रुग्ण हे बिनधास्त बाहेर फिरत असल्याचं आढळून आलं आहे. यामुळे इतर नागरिकांच्या आरोग्यास धोका असल्याने आता होम आयसोलेशनवर बंदी घालण्यात आली आहे.
सध्याच्या स्थितीला राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट एकूण राज्याच्या पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा जास्त आहे, त्यांना दोन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. त्यातील पहिली म्हणजे, होम आयसोलेशन १०० टक्के बंद करुन कोविड सेंटर वाढवा आणि तिथे रुग्णांना आयसोलेट करा. त्यासाठी अतिरिक्त कोविड सेंटर उभारले जाणार आहेत. तसेच राज्यातील सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्यास प्राधान्य देणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
मात्र आता राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाला पुण्याचे महपौर मुरलीधर मोहोळ यांनी कडकडून विरोध दर्शवला आहे. ‘राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी होम आयसोलेशन बंद करून रुग्णांना कोव्हिड सेंटरमध्ये उपचार देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र पुण्यातील लाट ओसरतीये असा निर्णय घेणं अव्यवहार्य आहे’, असा मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल आहे.
राज्य सरकारने पुणे शहरात रुग्णसंख्या कमी होत असताना असा निर्णय कसा घेतला?, अशी विचारणा मुरलीधर मोहोळ यांनी केली. राज्य सरकारने निर्णय घेतला असेल तर त्याचं आम्हाला पालन करावं लागेल. पण फ्लॅट, बंगलो, मोठ्या इमारतीत राहणारे लोक कोव्हिड सेंटरमध्ये कसे राहतील? त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेत ‘या’ खासगी रुग्णालयात १८ प्लस लसीकरण सुरु, एका डोससाठी तब्बल ९०० रुपये!
- ‘काँग्रेसच्या शशी थरूर यांची खासदारकी रद्द करा’, भाजपची मागणी
- वयाच्या तेविसाव्या वर्षापर्यंत अनाथालयात राहता येणार, शहरातील बालकाश्रमांकडून निर्णयाचे स्वागत!
- कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी राज ठाकरेंनी लिहले ‘हे’ खास पत्र
- ‘आज रात्रीपर्यंत काहिही होऊ शकते, मित्रानो तुम्हा सर्वांची खूप जास्त आठवण येईल’; शालूची भावूक पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
