🕒 1 min read
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून टूलकिट प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकमेकांवर निशाणा साधत टीकास्त्र सोडण्यात येत आहे. याच दरम्यान काँग्रेस खासदार आणि आयटी समितीचे सदस्य असलेल्या शशी थरूर यांच्यावर भाजपा खासदाराने हल्लाबोल केला आहे. ‘शशी थरूर यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करा’ अशी मागणी केली आहे.
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. त्यांना आयटी समिती सदस्य पदावरून हटवण्यासह त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निशिकांत दुबे यांनी केली आहे. याबाबत लोकसभा सभापती ओम बिरला यांना त्यांनी पत्र लिहिले आहे.
काय म्हटले आहे पत्रात?
शशी थरूर यांच्यामुळे संसद आणि भारताच्या प्रतिमेला तडा गेला आहे. करोना विषाणूच्या व्हेरियंटला भारताचं नाव ते वारंवार देत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं याचं नाव B.1.617 असं दिलं आहे. त्यामुळे त्यांनी वापरलेल्या शब्दामुळे भारताची प्रतिमा डागाळत आहे. भारत सरकारने या शब्दावर आक्षेप घेतला आहे. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्याची मागणी केली आहे. असं असूनही थरून वारंवार या शब्दाचा वापर करताना दिसत आहेत.
.@BJP4India के सांसद श्री @nishikant_dubey जी ने लिखा @loksabhaspeaker जी को पत्र.
seeking removal of @ShashiTharoor as “IT committee chairman” & disqualify him as an MP, as his irresponsible behaviour is encouraging social media platforms to disobey law of the land. pic.twitter.com/k9LiiHuZg5— Neelkant Bakshi ???????? (@neelkantbakshi) May 25, 2021
शशी थरूर हे देशाऐवजी काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी यांच्या अजेंड्यावर काम करत असल्याचा आरोपही निशिकांत दुबे यांनी केला. टूलकिटप्रकरणी आयटी मंत्रालयाकडून ते स्पष्टीकरण मागत आहे. ‘ट्विटर देशाविरोधात कारवाई करत असताना स्पष्टीकरण मागणं चुकीचं आहे. हे प्रकरण तपास यंत्रणांकडे आहे. आयटी समिती सरकारच्या कारवाईत दखल देऊ शकत नाही’ असंही दुबे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘इम्तियाज जलील हे दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचे काम करत आहेत’, शिवसेनेचा आरोप
- ‘तेव्हा ‘दीदी ओ दीदी’ केले, आता लोक ‘दादा गप्प बस दादा’ म्हणणार आहेत!’
- ‘राज्यपाल धनखड निवृत्त झाले तर तुरुंगात पाठवू’, बॅनर्जींच्या वक्तव्याने बंगालचे राजकारण पेटले
- भीक मागून कमावलेले पावणे दोन लाख चोरीला, मुंडेंच्या परळीतील घटना
- ‘कितीही कारवाई करा, १ जूननंतर आम्ही दुकानं उघडणारच’, खा.जलील यांचा ठाकरे सरकारला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
