मुंबई : देशभरात गेल्या दीड वर्षापासून ज्या तीन कृषी कायद्यांमुळे (Farm Laws) शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते ते तीन कायदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मागे घेतल्याची घोषणा केली आहे. दीड वर्षापासून सुरू असलेल्या या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. यावरून सध्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटण्यास सुरवात झाली आहे.
यावरून आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी नरेंद मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘मोदींच्या निर्णयावर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केला. मोदी सरकार अध्यादेश का आणत नाही?, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला.
‘शेतकऱ्यांची हत्या केली जात होती. तसेच त्यांना अटक, मारहाण केली जात होती. तुमचं सरकार हा अन्याय करत होत आणि आज तुम्ही म्हणता कायदे मागे घेतो. मग तुमच्यावर आम्ही विश्वास कसा विश्वास ठेवायचा?’, असे म्हणत प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
पुढे त्या म्हणाल्या, प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी अध्यादेश काढता. मग कृषी कायदे रद्द करणारा अध्यादेश का काढला नाही. निवडणुका आल्यावरच अध्यादेश काढणार आहात का? केवळ निवडणुकीसाठी निर्णय घेणार का?, असे प्रश्न देखील त्यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा
- शेतकाऱ्यांसामोर या आधीही घ्यावी लागली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींना माघार
- ‘हे’ दुःखद, लज्जास्पद, पूर्णपणे अन्यायकारक; केंद्र सराकराच्या निर्णयावर कंगना नाराज
- ‘शेतकरी आंदोलनात ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जीव गेला, याला जबाबदार कोण?’
- ‘त्या गोष्टीवर काम करायला हवे’; गौतम गंभीरने सांगितली सूर्यकुमारची मोठी कमजोरी


