🕒 1 min read
दर्यापुर – संपूर्ण देशावर सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट आहे. सर्वसामान्य जनतेला सत्ताधारी नेते कोरोना नियमांचे पालन करण्याचे सल्ले देत आहेत. कोरोना पसरू नये म्हणून अनेक सणांवर देखील निर्बध घातले गेले आहेत. राज्यात मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जाणाऱ्या गणेशोत्सवाबाबत देखील अनेक कठोर निर्बंध सरकारने घातले आहेत. राज्यात मंदिरे बंद आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला सत्ताधारी नेत्यांना मात्र राज्यात मेळावे घेण्यापासून गर्दी जमवायला परवानगी सरकारने दिली आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हे गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असून ठिकठिकाणी जाऊन गर्दी जमवत असल्याचे दिसून येत आहे. शेख हे काल दर्यापुर तालुका जिल्हा अमरावती येथे रात्री १२:३० वाजता पोहचले. यावेळी देखील युवक पदाधिकारी यांनी ठिकठिकाणी उत्साहात स्वागत केले. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन करत मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. शेख यांच्यासह त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांनी तोंडाला मास्क सुद्धा लावला नसल्याचे दिसून येत आहे.
दर्यापुर तालुका जिल्हा अमरावती येथे रात्रीचे १२:३० वाजता देखील युवक पदाधिकारी यांनी ठिकठिकाणी उत्साहात स्वागत केले
तसेच येवदा तालुका दर्यापुर या ग्रामपंचायतीचा भेट देऊन रात्री १२ वाजता समस्या जाणून घेतल्या येवदा या गावत आदरणीय पवार साहेब हे दोन वेळा येऊन गेल्याचे ग्रामस्थांनी pic.twitter.com/o4heq9ODCz— Mahebub Shaikh ( महेबुब शेख ) (@MahebubShaikh20) September 9, 2021
राज्यात तिसऱ्या लाटेच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. म्हणून राज्य सरकार तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना करत आहेत. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि महत्वाचे नेतेच कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन कराताना दिसत आहेत. यामुळेच राज्य कोरोनाच्या सावटाखाली असताना अशी गर्दी जमवणे योग्य आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे. सरकारने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन जनतेने करावे अशी सरकारची इच्छा असेल तर मग शेख यांच्या सारख्या नेत्याला सवलत का दिली जात आहे असा देखील सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्यावेळी त्यांच्यावर ज्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले त्याप्रमाणे शेख आणि या कार्यक्रमांच्या आयोजकांवर गुन्हे दाखल का केले जात नाहीत असा देखील सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारधील नेते, मंत्री त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना काळात काळजी घेण्याचे आवाहन जनतेला करत आहेत. दस्तुरखुद्द खा. शरद पवार यांनी गर्दी होईल अशा कार्यक्रमांना जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे. एवढेच नव्हे तर गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम घेण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने मनाई करण्यात आली मात्र पक्षाचा आदेश पक्षातील नेतेच धुडकावत असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने की…’; भुजबळांचे खास शायरीतून विरोधकांना प्रत्युत्तर
- मोठी बातमी : पुणे पोलिसांकडून नीलम राणे, आमदार नितेश राणेंविरोधात लूक आऊट नोटीस
- मुंबईत कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘अशी’ आहे नियमावली
- पुण्यात गणेशोत्सव काळात खरंच जमावबंदी ? दिवसभरातील चर्चांनंतर पोलिसांकडून स्पष्टीकरण
- औरंगाबादेतून ७५ बसेस गणपती उत्सवासाठी कोकणात रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

