मुंबई : अभिनेता हृतिक रोशनची केस सायबर सेलकडून आता क्राइम ब्रॅंच इंटेलिजन्ट यूनिटला ट्रान्सफर करण्यात आला आहे. क्राइम ब्रॅंचचे प्रभारी आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी याचे आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार हृतिक रोशनच्या एफआयआरवर तपास करण्यासाठी केस सायबर सेलकडून क्राइम ब्रॅंचच्या क्राइम इंटेलिजन्स यूनिटके देण्यात आली आहे.
एका ‘शो’ दरम्यान कंगनाने हृतिक आणि माझ्यात प्रेम संबंध होते असा दावा केला होता. परंतु हृतिकने हा दावा खोटा असल्याचे सांगितले आणि कंगनानेच मला मेल केले होते. या प्रकरणावरून हृतिकने २०१३ ते २०१४ दरम्यान १०० ई-मेल आले होते. असे सांगितले, ई-मेल अभिनेत्री कंगना रणौतच्या ई मेल आयडीवरून पाठवण्यात आले होते. याबाबत हृतिक रोशनने २०१७ मध्ये सायबर सेलकडे एक तक्रार दिली होती. ई-मेल कंगनाच्या आयडीवरून आले होते. त्यावेळी कंगना म्हणाली होती की, तिचा ई-मेल आयडी हॅक झाला होता आणि तिने हृतिक रोशनला कोणताही ई-मेल केला नाही.
यावरच अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने ट्विट केलं की, ‘त्याची कहाणी पुन्हा सुरू झाली. आमच्या ब्रेकअप आणि त्याच्या डिवोर्सला इतके वर्षे होऊन गेले आहे. पण तो पुढे जाण्यास नकार देतोय. कोणत्याही महिलेला डेट करायला नकार देतो. बस जशीही मी माझ्या पर्सनल लाइफमध्ये काही मिळवण्यासाठी साहस करते तेव्हा तो पुन्हा तेच नाटक सुरू करतो. हृतिक रोशन कधीपर्यंत रडशील एका छोट्याशा अफेअरसाठी’.
महत्वाच्या बातम्या
- मनसे सोबत आली तर वाईट काय?; निलेश राणेंचं सूचक वक्तव्य
- मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ची पाणीपट्टी थकीत? बीएमसीने केला खुलासा
- दानवेंची जीभ छाटणाऱ्यास बक्षीस जाहीर करणाऱ्या शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक!
- …अन अजितदादांना आठवले ‘ते’ दिवस? फडणवीसांना म्हणाले मुख्यमंत्री!
- ‘…पण दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या दडपशाहीचे काय? त्या आणीबाणीवर बोला!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

