मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यासह इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाची 24 लाख 56 हजार 469 रुपयांची पाणीपट्टी थकली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला डिफॉल्टर म्हणून घोषित केला आहे.
माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वर्षा बंगला, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठीचा तोरणा बंगला यासह अन्य मंत्री, विरोधी पक्षनेते यांच्या देखील निवासस्थानाचं देखील पाणीपट्टी थकल्याचं समोर आला आणि दिवसभर वृत्तवाहिन्यातून हे प्रकरण गाजलं.
या सर्व प्रकरणानंतर मुंबई महानगरपालिकेनं स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यासह इतर मंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानाकडे पाण्याची एकूण २४ लाख ५६ हजार ४६९ थकबाकी आहे, असा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी महापालिकेच्या संकेतस्थळावरुन पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती संकलित केल्यानंतर केला होता. मुंबई महापालिकेनं शकील अहमद शेख यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचं सांगितलं आहे.
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या बंगल्याची पाणीपट्टी थकबाकी नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या अहवालानुसार वर्षा आणि तोरणा या दोन्ही बंगल्यांची थकबाकी ‘शून्य’ आहे, असा खुलासा मुंबई महापालिकेनं केला आहे.

कोणकोणत्या नेत्यांच्या बंगल्याचं थकबाकीमध्ये नाव?
अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देवगिरी, जयंत पाटील यांचा सेवासदन, ऊर्जा मंत्री नितीन राउत यांचा पर्णकुटी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा रॉयलस्टोन, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सागर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा मेघदूत, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा पुरातन, मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा शिवगिरी.
तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा नंदनवन, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा जेतवन, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा चित्रकुट, मंत्री राजेश शिंगणे यांचा सातपुडा, नवाब मलिक यांचा मुक्तागिरी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा रामटेक आणि सभापती रामराजे निंबाळकर यांचा अजंठा तसेच सह्याद्री अतिथी गृहाची पाणीपट्टी थकल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या संकलित माहितीवरून करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या
- मनसे सोबत आली तर वाईट काय?; निलेश राणेंचं सूचक वक्तव्य
- युट्युबसह जीमेल डाऊन; अवघ्या काही वेळात मिम्सचा धुमाकूळ
- दानवेंची जीभ छाटणाऱ्यास बक्षीस जाहीर करणाऱ्या शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक!
- …अन अजितदादांना आठवले ‘ते’ दिवस? फडणवीसांना म्हणाले मुख्यमंत्री!
- फर्ग्युसन महाविद्यालयात ‘लॅबोरेटरी शुल्क’ विरोधात अभाविपचे आक्रमक आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

