जालना : एकीकडे दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी धक्कादायक विधान केलं आणि ऐन हिवाळ्यात राजकारण तापलेलं पाहायला मिळतंय. शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही असंही ते म्हणाले होते.
दानवेंच्या या वक्तव्यानंतर शेतकरी नेत्यांसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. देशातील शेतकऱ्यांना खलिस्तान, पाकिस्तान आणि चीन यांची फूस असल्याचा आरोप करुन शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचा राजीनामा घेवून मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसने देखील केली आहे.
दरम्यान, शिवसेनेनं तर चक्क दानवेंनी जीभ छाटणाऱ्यास 1लाखोंचं बक्षीसचं जाहीर केलं. दानवेंची जीभ छाटणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस आणि लोकवर्गणीतून मिळालेली चारचाकी वाहन देऊ’, अशी घोषणा यवतमाळ शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांनी केली होती. आता भाजप देखील शिवसेनेविरोधात आक्रमक झाला आहे.
संतोष ढवळे यांची ही घोषणा लोकशाही विरोधी असून ढवळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करा,अशी तक्रार भाजप युवा मोर्चाच्या वतीने जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यासंदर्भात न्यूज १८ लोकमतने वृत्त दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आंदोलकांना घरात घुसुन मारलं जात आहे, देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप
- युट्युबसह जीमेल डाऊन; अवघ्या काही वेळात मिम्सचा धुमाकूळ
- महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांवर इंग्रजांपेक्षा जास्त दडपशाही करून थट्टा केलीये – रवी राणा
- ‘राज्याचे मंत्री टू-व्हीलरने दिल्लीला जातात, पण आधी महाराष्ट्रात तरी दिवे लावा’
- ग्रामपंचायत निवणुकांसाठी राज ठाकरेंनी ठोकला शड्डू !


