Share

मनसे सोबत आली तर वाईट काय?; निलेश राणेंचं सूचक वक्तव्य

Published On: 

चिपळूण : नुकत्याच राज्यात शिक्षक आणि पदवीधर निवडणुकींच्या तोफा थंडावल्या आहेत. विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी सुरळीतपणे निवडणुका पार पडल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका आता जानेवारीत होणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज भाजप नेते निलेश राणे यांनी आज चिपळूणमध्ये पत्रकार परिषद घेऊन आगामी स्थानिक निवडणुकांसाठी रणशिंग फुंकलं आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेला लक्ष्य करत २०२४ साली कोकणातील सर्व आमदार खासदार हे भाजपचेच असतील अशी गर्जना केली. तसंच, ‘सर्व मित्रपक्षांसोबत स्थानिक निवडणुकांसाठी चर्चा करणार असून जर मनसे सोबत आली तर वाईट काय?’ असं सूचक विधान केलं आहे. दरम्यान, मनसेशी हातमिळवणी स्थानिक पातळीवर असेल असा उल्लेख देखील त्यांनी केला.

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी, भाजप, वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता मनसेनेही कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्षांना आपल्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा उमेदवार उभा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुका पूर्ण ताकदीनं लढवण्याच्या सूचनाही राज ठाकरे यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

कशा असतील या निवडणुका?

राज्यातल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसंच नव्याने स्थापित झालेल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारीला होईल आणि 18 जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!