Share

…अन अजितदादांना आठवले ‘ते’ दिवस? फडणवीसांना म्हणाले मुख्यमंत्री!

Published On: 

मुंबई : वर्षभरापूर्वी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अभूतपूर्व राजकीय घडामोड घडल्या होत्या. राज्यात भाजपाला सत्तेबाहेर ठेवून महाविकास आघाडी आकारास येत असल्याचे निश्चित झाले असतानाच भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे वृत्त धडकले होते. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या खेळीमुळे हे पहाटेचे सरकार अल्पजीवी ठरले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची ती मैत्री काही तासांपुर्ती मर्यादित राहिली असली, तरी आजही अजित पवार त्या मैत्रीला विसरू शकलेले नाहीत हे आजच्या एका घडामोडीवरून दिसून आलं आहे. राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.

या अधिवेशनाच्या सुरुवातीस दिवंगत लोकप्रतिनिधी आमदार व नेत्यांसह मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हे अधिवेशन सुरु होण्याआधीच विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी रणनीती दाखल्याची दिसून आली होती. अनेक आरोप, टीका या सरकारवर करण्यात आल्या. मात्र, आजच्या दिवसात अशी एक घटना घडली ज्याची चर्चा संबंध दिवसभर राजकीय क्षेत्रात सुरु होती.

भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंग यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं होतं. या अधिवेशनाच्या सुरुवातीला शोकसभेमध्ये त्यांची आठवण सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांशी सहमत असल्याचं विधान करताना त्यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केला. आपली ही चूक लक्षात येताच त्यांनी ती दुरुस्त करून पुन्हा विरोधी पक्षनेते असा त्यांचा उल्लेख केला. पवारांच्या या गोंधळाची आता चांगलीच चर्चा सुरु असून त्यांची वर्षभरापूर्वीची जुनी मैत्री अजूनही ते विसरलेले नाहीत अशा चर्चा सुरु झाल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!