Share

औरंगाबादेतील पुरातन सेंट फ्रान्सिस डी सेल्स कॅथेड्रल चर्चमध्ये कसा साजरा होतो ख्रिसमस; जाणून घ्या!

Published On: 

औरंगाबाद : १९५३ साली स्थापना झालेले औरंगाबाद शहरातील छावणी परिसरात असलेले अत्यंत जुने सेंट फ्रान्सिस डी सेल्स कॅथेड्रल चर्च. गेल्या काही वर्षांमध्ये हे चर्च बाजूलाच असलेल्या जुन्या जागेतून नव्या जागेत स्थलांतरित करण्यात आले. तर २ वर्षांपूर्वी वसईतील कारागिरांद्वारे या चर्चचे रुपडे बदलण्यात आले. येथे आधुनिक रचना आणि पारंपारिकतेचा संगम जुळवण्यात आला आहे. त्यामुळे आधीच मनामनात शांतता प्रस्थापित करणाऱ्या या चर्चचे लोभसवाणे रुप आणखीनच आकर्षक झाले आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस साधेपणाने साजरा केला जात होता. आता कुठे प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यंदा सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ख्रिस्ती धर्मात मुखत्वे तीन धर्मपंथ आढळून येतात. रोमन कॅथोलिक, ईस्टर्न ऑर्थोडॉक्स, प्रोटेस्टंट पंथ. औरंगाबाद शहरात ५ रोमन कॅथलिक चर्च आहेत. यामध्ये शहरातील ४ चर्चचा समावेश असून वाळूज येथील एका चर्चचा समावेश आहे. शहरात रोमन कॅथलिक पंथाचे एकूण ३०० कुटुंब आहेत. तर प्रोटेस्टंट पंथीयांची संख्या त्या तुलनेत कमीच आहे. मात्र ख्रिसमस हा सण सर्वच पंथात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. दर वर्षी २५ डिसेंबर रोजी हा सण साजरा केला जातो. यादिवशी ख्रिस्ती बांधवांचे लाडके प्रभू येशू यांचा जन्म झाला होता.

ख्रिस्ताच्या जन्मघटकेचे स्मरण करण्यासाठी मिस्सा म्हणजेच प्रार्थना मध्यरात्री केली जाते. यात २४ आणि २५ डिसेंबरची रात्र ही या सणातील महत्त्वाची असते. कारण यावेळी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला अशी मान्यता आहे. २४ डिसेंबरच्या रात्री १० वाजता कॅरोल सिंगिंग म्हणजेच विशेष प्रकारच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. तर २५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता विशेष प्रार्थनेचे आयोजन केले जाते. कॅथोलिक चर्चच्या फादर विलास यांनी शिक्षण, आरोग्य, समाजसेवा क्षेत्रात आमचे कार्य असल्याचे सांगितले.

५०० ची क्षमता मात्र ५० टक्के प्रवेश

सेंट फ्रान्सिस डी सेल्स कॅथेड्रल चर्चमध्ये एकूण ५०० लोकांची बसण्याची क्षमता आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा ही ५० टक्केच लोकांना प्रवेश देण्याचा निर्णय चर्च प्रशासनातर्फे घेण्यात आला होता. शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून आम्ही हा उत्सव साजरा केल्याचे फादर विलास पेगार्डो यांनी सांगितले. तसेच मास्क नाही तर प्रवेश नाही, हे सूत्र २५ डिसेंबर रोजी दर्शनासाठी येणाऱ्यांना लागू करण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!