औरंगाबाद : ज्या शहरामध्ये चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील असतील त्या शहरात ‘अशांतता’ कशी असेल? त्या शहरात तर सगळीकडे शांतताच-शांतता असेल असे प्रतिपादन खासदार इम्तियाज जलील यांनी केलंय. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आम्ही दोघेही या शहरात आहोत, त्यामुळेच या शहरात शांतता असल्याचा दावाही त्यांनी केला.
गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांनी गणेश महासंघाच्या बॅनरवर मी माझा फोटो शोधत होतो, असा टोला लगावला. आपल्या शहरात हिंदू-मुस्लिमांसह सर्व जाती धर्माचे लोक आनंदाने राहातात. शिवजयंती असो की गणेश उत्सव सर्वच एकत्र साजरी करण्याची आपल्या शहराती पंरपरा असल्याचे ते म्हणाले.
गणेश उत्सवाच्या काळात छोट-छोट्या व्यापाऱ्यांना आणि दुकानदारांना प्रशासनाने त्रास देवू नये. कोरोनाच्या नावाखाली अनेक महिन्यांपासून छोटे व्यापारी त्रस्त असल्याचेही ते म्हणाले. आता उत्सव काळात तरी त्यांना व्यापार करण्यासाठी सवलत देण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली. छोटे फुल विक्रेते, पुजेचे साहित्य विक्रेते यांना प्रशासनाने थोडी सुट द्यावी, त्यांना कोरोनाच्या नावावर त्रास देण्यात येवू नये, अशी मागणीही त्यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्रात सरकारमध्ये बसलेले लोक काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसलेत का?’
- मराठा आरक्षणातील अडसर दूर होणार ? संभाजीराजेंनी राष्ट्रपतींकडे केल्या ‘या’ २ महत्वाच्या मागण्या
- ‘तुम्ही पडद्याआडून पाहात प्रेम का करत आहात?’ ओवेसींचा पंतप्रधान मोदींना सवाल
- ‘…म्हणजे सीबीआयचा तो अहवाल खरा आहे’; नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट
- ‘गुडमॉर्निंग अण्णा, आमच्यासाठी आंदोलन कधी?’ व्यंगचित्राद्वारे राष्ट्रवादीचा खोचक सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

