मुंबई – खासदार संभाजीराजे छत्रपती हे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असून येत्या २८ मे रोजी ते पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणाविषयी सविस्तर भूमिका जाहीर करणार आहेत. सध्या संभाजीराजे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून विविध भागांमध्ये समाज बांधवांच्या भेटी व बैठक घेऊन त्यांच्या भावना समजावून घेत आहेत.
मराठा आरक्षण प्रश्नी चर्चा करण्यासाठी संभाजीराजे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील बैठक संपली आहे. मराठा समाज किती अस्वस्थ आहे, किती दु:खी आहे. तसंच मराठा समाजाच्या परिस्थितीची कल्पना शरद पवारांना दिली.
मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली असली तरी त्यामधून काहीही साध्य होणार नाही, असे वक्तव्य शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केले. एकीकडे संभाजीराजे शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हणतात. मात्र, अवघ्या 10 मिनिटांच्या या भेटीत मराठा आरक्षण, नोकऱ्या, सारथी या सर्व विषयांवर चर्चा कशी काय होऊ शकते, असा सवाल विनायक मेटे यांनी उपस्थित केला.
लोकशाहीत कोणीही कोणाला भेटू शकते. मात्र, शरद पवार यांचा मराठा आरक्षणाविषयीचा आजपर्यंतचा दृष्टीकोन पाहता या भेटीतून काहीही साध्य होणार नाही.संभाजीराजे छत्रपती हे राजे आहेत. आम्ही प्रजा आहोत. ते कोणालाही भेटू शकतात. आम्ही जनतेमध्ये जाऊन जनजागृती करत आहोत. आता संभाजीराजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं असतं तर ही वेळच आली नसती, अशी टीका विनायक मेटे यांनी केली.
दरम्यान, या भेटी दरम्यान आरक्षण देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा; अशी मागणी संभाजीराजेंनी पवारांकडे केली.या संदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. तर संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहे, अशी माहिती संभाजीराजे यांनी बैठकीनंतर दिली. मराठा समाजावर अन्याय होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नारायण राणे, अजित पवार यांनी पुढाकार घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा. शरद पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे, असंही संभाजीराजे म्हणाले.
‘दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली. या भेटीत संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात रद्द झाले आहे. त्यामुळे समाज हा अस्वस्थ आहे. सध्या परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला पाहिजे. मराठा आरक्षणासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- मागासवर्गीय पदोन्नतीचा आदेश रद्द करण्यात यावा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
- डॉक्टरांविषयी ‘ते’ वक्तव्य अंगलट; IMA कडून बाबा रामदेव यांना १ हजार कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस
- ‘तुम्ही तज्ज्ञ नाहीत, रुग्णांच्या जिवाशी खेळू नका’, व्हेंटिलेटर प्रकरणावरून खंडपीठाने नेत्यांना सुनावले
- ‘राज्यकर्त्यांनी राजकारण सोडून मराठा समाजासाठी एकत्र यावे’, खा.संभाजीराजेंचे आवाहन
- मराठा आरक्षणासाठी आपण पुढाकार घ्यावा, संभाजीराजेंची शरद पवारांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

