🕒 1 min read
मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात देखील आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असून मागील लाटेपेक्षा यंदा स्थिती गंभीर झाली आहे. ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे.
दरम्यान, आयपीएल मधून राजस्थानच्या संघाकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज अँड्र्यू टाय यानं काही खासगी कारणं देत या स्पर्धेतून माघार घेतली आहे. कोरोना महामारीचं वाढतं संकट असताना देखील आयपीएल स्पर्धा सुरु आहेत. आयपीएलमध्ये फ्रँचायझीकडून मोठ्या प्रमाणात पैसा उधळला जात आहे. या परिस्थितीवर टायनं याबाबत नाराजीही व्यक्त केली आहे.
आपण सर्वांच्याच मतांचा आणि विचारसरणीचा आदर करत असून, कोरोना काळात अनेकांसाठी आयपीएल हे मनोरंजनाचं साधन ठरत असल्यास ही स्पर्धा सुरुच ठेवावी, असंही मत त्यानं मांडलं. ‘भारतीय दृष्टीकोनातून पाहायलं झाल्यास अनेक रुग्णांना रुग्णालयात जागाही मिळत नसताना या कंपन्या आणि फ्रँचायझी आयपीएलमध्ये पैसा ओततातच कसा?’, असा प्रश्न cricket.com.au. शी संवाद साधताना त्यानं उपस्थित केला. आपल्याप्रमाणेच इतरांचीही मतं असतील असं नाही, त्यामुळं आपल प्रत्येकाच्याच मताचा आदर करत असल्याचंही तो म्हणाला.
महत्वाच्या बातम्या
- हॉटेलच्या किचनमध्ये लपवलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा पोलिसांनी केला हस्तगत
- भाजपाच्या पुढाकारातून अंधेरी, कांदिवलीत दोन नव्या कोविड सेंटर्सचा प्रारंभ
- ऑक्सिजनबाबत बुलडाणा प्रशासन गाफिल, आ.श्वेता महालेंची तक्रार
- होम आयसोलेशन बंद करून सक्तीचे विलगीकरण करा, मंत्री थोरात यांच्या सुचना
- ‘शैक्षणिक वर्ष संपल्याची घोषणा करा’, शिक्षणमंत्री गायकवाड यांना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
