Share

मतदानादिवशी मोदी बंगालमध्ये रॅली कसे काय करू शकतात ? बॅनर्जींचा निवडणूक आयोगाला सवाल

Published On: 

🕒 1 min read

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर संपूर्ण देशाच लक्ष लागलेल आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वत: नंदीग्राम मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. १० मार्च रोजी नंदीग्राम मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारी ममता बॅनर्जी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, आणि याच मतदारसंघात ममता बॅनर्जी या जखमी झाल्या होत्या.

आज दुसऱ्या टप्प्यातील ३० जागांसाठी मतदान होत आहे. नंदीग्राम या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे शुभेंदु अधिकारी एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. यांच्यात मुख्य लढत होत आहे. हि रणधुमाळी सुरु असतांना पुन्हा एकदा हिंसाचार पाहायला मिळत आहे. आज दुपारी शुभेंदु अधिकारी यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली होती.

सकाळपासूनच बंगालमधील वेगवेगळ्या भागातून हिंसाचार झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. तर ममता बॅनर्जी मतदान केंद्रावर पाहणीसाठी व्हील चेअरवर पोहोचल्या होत्या.

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी म्हणाल्या, नंदीग्राममध्ये भाजप जिंकणार नाही. नंदीग्राममध्ये आम्हाला ९० टक्के मते मिळाली आहेत. त्या म्हणाल्या, मतदानाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी रॅली कशी काय करू शकतात. हे आचारसंहितेचे उल्लंघन नाही का? निवडणूक आयोग काय करत आहे? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!