Share

‘चौकशा कसल्या करताय, हकालपट्टी करा अनिल देशमुखांची’

Published On: 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले असून, अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते,असा खळबळजनक दावा त्यांनी केला. याप्रकरणी भाजप आणि विरोधक आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, प्रकरण अंगाशी येताच ठाकरे सरकारच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. महाविकास आघाडीमधील सर्व महत्वाच्या नेत्यांच्या आता या प्रकरणी प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या गंभीर प्रकरणावर मौन सोडलं आहे.

‘राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर लागलेले आरोप हे गंभीर आहेत. सचिन वाझेंनी मनसुख हिरेन यांच्या गाडीत स्फोटकं ठेवली. सचिन वाझे यांना परमबीर सिंह यांनीच पुन्हा रुजू करून घेतलं होतं. यात गृहमंत्र्यांचा संबंध नाहीत. तर, राजीनाम्याचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. अनिल देशमुख यांच्या गृहमंत्रीपदाबाबत तेच निर्णय घेतील. त्यांनी योग्य चौकशी करूनच निर्णय घ्यावा,’ असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी चौकशीची मागणी केल्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘बरेच काही बोलून काहीही न सांगणे हे पवारांचे वैशिष्ट्य. पत्रकार परिषदही तशीच होती. चौकशा कसल्या करताय, हकालपट्टी करा अनिल देशमुखांची,’ असं भातखळकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!