सिंधुदुर्ग : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले असून, अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते,असा खळबळजनक दावा त्यांनी केला. याप्रकरणी भाजप आणि विरोधक आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकरणावर भाष्य करत भाजप व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सचिन सावंत यांच्या या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.
‘काँग्रेसचा चप्पल उचल्या प्रवक्ता सचिन सावंत जनतेतून कधी आमदार होऊ शकत नाही आणि राज्यपालांच्या कोट्यातून पण नाही. ज्याला आमदारकीला फक्त १२०० मतं मिळाली तो सचिन सावंत जनेतून नगरसेवक पण होऊ शकत नाही पण वार्ता एवढ्या मोठ्या करतो की जसं ३०० खासदार ह्यानेच निवडून आणले. एक नंबर फालतू,’ अशी जहरी टीका निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
काँग्रेसचा चप्पल उचल्या प्रवक्ता सचिन सावंत जनतेतून कधी आमदार होऊ शकत नाही आणि राज्यपालांच्या कोट्यातून पण नाही. ज्याला आमदारकीला फक्त १२०० मतं मिळाली तो सचिन सावंत जनेतून नगरसेवक पण होऊ शकत नाही पण वार्ता एवढ्या मोठ्या करतो की जसं ३०० खासदार ह्यानेच निवडून आणले. एक नंबर फालतू.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 21, 2021
सचिन सावंत यांचे गंभीर आरोप –
राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं वातावरण भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक निर्माण केलं जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. ‘विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांत कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र निर्माण करायचं. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करायचा. येनकेन प्रकरणाने सत्ता उलथवायची. साम दाम दंड भेद अशा सगळ्या मार्गांचा वापर करून सरकारं पाडायची, असे उद्योग भाजपनं मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये गेल्याच वर्षात केले,’ असं सावंत म्हणाले आहेत.
तर, ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर आता काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी सरकारच्या बचावासाठी पुढे सरसावला आहे.२००२ साली अमित शाह गुजरातच्या गृहराज्य मंत्रीपदी होते तेव्हा तत्कालीन पोलीस प्रमुख डी.जी. वंजारा यांनी अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तेव्हा भाजपने अमित शाह यांचा राजीनामा घेतला होता का ?’ असा प्रश्न काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, ‘एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याने आरोप केले तर त्याची शहानिशा न करताच ते खरे कसे मानायचे, असा सवाल सावंत यांनी विचारला. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असतानाच्या प्रकरणांचा दाखला दिला. २००२ साली गुजरातचे तत्कालीन पोलीस प्रमुख डी.जी. वंजारा यांनी अमित शाह हे पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप केला होता.’
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपस्थित करण्यात आलेल्या शंकेची परमबीर सिंग यांनी हवाच काढली
- जोपर्यंत गृहमंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत भाजप आंदोलन करणार : फडणवीस
- खळबळजनक! ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली नाही म्हणून तरुणाचा खून
- काठीने मारहाण करून वृध्दाचा खून करणाऱ्या ‘त्या’ आरोपीस जन्मठेप!
- एमपीएससी; लातूर शहरातील १९ परीक्षा केंद्रावर सात हजार ८९६ विद्यार्थी देणार परीक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

