🕒 1 min read
मुंबई : राज्यात कोरोना रोगाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. देशातील केंद्रीय आरोग्यमंत्रालयातर्फे देशातील टॉप-१० कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यांची घोषणा करण्यात आली आहे. देशात ऍक्टिव्ह रुग्णांमध्ये पुणे जिल्हा अव्वल आहे. तर महाराष्ट्रातील एकूण ७ जिल्ह्यांचा यात समावेश आहे. यामुळे राज्यातील धोका हा झपाट्याने वाढत आरोग्य सुविही देखील अपुऱ्या पडत असल्याचं काही शहरांमध्ये दिसून येत आहे.
यामुळे महाराष्ट्र सरकार कोरोना हाताळण्यात अपयशी ठरल्याची टीका भाजप नेते व खासदार नारायण राणे यांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व सुपुत्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. हाच मुद्दा पकडत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. जो व्यक्ती कुटुंबाला सांभाळू शकत नाही, तो महाराष्ट्राला काय सांभाळणार ? असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे केंद्राकडे बोट दाखवत आहेत. याशिवाय त्यांनी बाकी जे कारणं सांगितले आहेत, डॉक्टर नर्सेस नाहीत, पण ही कुणाची जबाबदारी आहे? तुम्ही माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणालात त्यामुळे जर महाराष्ट्र तुमचे कुटुंब असेल तर या सर्व गोष्टी तुम्ही उपलब्ध केल्या पाहिजेत. रुग्णांवर योग्यरित्या उपचार करणं, त्यांना ठणठणीत करणं ही तुमची जबाबदारी नाही का? पिंजऱ्यात का जाऊन बसताय? मातोश्रीच्या बाहेर पडत नाही. जो व्यक्ती कुटुंबाला सांभाळू शकत नाही. तो व्यक्ती महाराष्ट्राला कसं सांभाळणार? कोरोना हाताळायला हे सरकार कमी पडलं आहे.’ असा प्रहार नारायण राणे यांनी आज मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘लालू सरकारला ही लाजवेल अशी स्थिती आज महाराष्ट्रात आहे’
- गिरीश बापट यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेवून केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या
- Breaking : ११ एप्रिल रोजी होणारी MPSC परीक्षा पुढे ढकलली
- निवडणुका असणाऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांवर त्वरित निर्बंध घाला – मनसे
- महाराष्ट्राची वाटचाल पुन्हा कडक लॉकडाऊनच्या दिशेने ? राजेश टोपे यांचे मोठे विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
