मुंबई : देशभरात करोना व्हायरसचा उद्रेक सुरूच आहे. करोना रुग्णांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. राज्य सरकारांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरूवारी देशात एकूण १.३१ लाख नवीन करोना रुग्णांची भर पडली. तर, जवळपास ८०० जणांचा मृत्यू झाला. देशात करोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे राज्यातील परिस्थिती अधिकच चिंताजनक होत चालली आहे. अशात पुढील १० दिवसांत महाराष्ट्रात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 10 लाख पर्यंत जाऊ शकते अशी शक्यता ग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. त्यासोबतच राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो, असे संकेत देखील त्यांनी दिले आहेत.
त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील लॉकडाऊन बाबत मोठे विधान केले आहे. ‘जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर महाराष्ट्र लॉकडानच्या दिशेने वाटलाच करेल’, असं राजेश टोपे यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे. ‘आम्ही लॉकडाउनच्या समर्थनात नाही, पण जर परिस्थिती सुधारली नाही तर साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन महत्वाचा आहे,’ असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, दुसरीकडे ‘राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याने राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो, असे संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, कोणत्याच उपायाला यश येताना दिसत नाही. परिणामी लोकांचे जीव वाचवण्यासाठी काही दिवसांचा कडक लॉकडाऊन गरजेचा असल्याचे सूतोवाच विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
पुढच्या दहा दिवसांत महाराष्ट्रात 10 लाखअॅक्टिव्ह रुग्ण असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे विरोधकांनी यावर राजकारण न करता आम्हाला उपाय सुचवावेत. सध्याच्या घडीला देशाच्या अनेक भागांमध्ये लॉकडाऊन आहे. गुजरातमध्येही अनेक जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन आहे. मात्र, भाजपचे नेते त्यावर काही बोलत नाहीत. फक्त महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला तर भाजपचे नेते टीका करायला सुरुवात करतात, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘लालू सरकारला ही लाजवेल अशी स्थिती आज महाराष्ट्रात आहे’
- डेटा पुरेसा नसल्याने WHO ने फेटाळली सिरम इन्स्टिट्यूट ‘ही’ मागणी
- अँपच्या माध्यमातून नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविणार
- केवळ दोन षटकारात इतिहास रचण्यास पोलार्ड सज्ज
- देशात २.४ कोटी लसींचा स्टॉक, अफवांवर विश्वास ठेवू नका-केंद्र सरकारचे स्पष्टीकरण


