🕒 1 min read
नवी दिल्ली- महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. त्यात काही ठिकाणी वाढत्या रुग्णांना आरोग्य सेवा पुरवताना शासन आणि प्रशानसनावर प्रचंड ताण येत आहे. सरकारी यंत्रणा हतबल ठरत आहेत. वाढत्या मृत्यूदराबरोबरच भीतीही वाढत आहे.
कोरोनाचा उद्रेक झाल्याने पुणे शहरातील लसीकरणाची मोहीम अधिक गतिमान करावी व किमान आठवडाभर पुरेल एवढा प्रतिबंधक लसीचा पुरवठा करावा अशी मागणी काल खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली. यावेळी महाराष्ट्राला कोविडचे सुमारे साडे एकोणीस लाख डोस दिले जातील. असे आश्वासन हर्षवर्धन यांनी दिले.
काल पुणे जिल्ह्यात सुमारे साडेदहा हजार कोविडचे रुग्ण सापडले. ही संख्या चिंताजनक असून महाराष्ट्रातील आजची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रतिबंधक लस देण्याची मोहीम अधिक गतिमान करावी तसेच रुग्णालयातील बेडसची संख्या वाढवण्यासाठी मदत करावी. असे निवेदन बापट यांनी केन्द्रीय आरोग्य मंत्री यांना दिले.
पुण्यात सरासरी दररोज पंचवीस हजार नागरिक लस टोचून घेतात. तथापि शहराला दर आठवड्याला सुमारे दोन लाख वायल्स इतकी लस गरजेची आहे. लशीचा पुरवठा कमी झाल्याने या मोहिमेवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील खाजगी रुग्णालयांना लस देण्याची परवानगी द्यावी. अशी आमची मागणी आहे असे बापट यावेळी म्हणाले.
याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे यापूर्वीच पाठविण्यात आला आहे. शहरातील अशा २१५ खाजगी रुग्णालयात लसीकरण करता येईल. त्या रुग्णालयाची यादीही बापट यांनी सादर केली आहे. तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त व अंथरुणाला खिळून असलेल्या वृद्ध नागरिकांसाठी मोबाईल लसीकरण व्हॅन सुरू करण्याची परवानगी पुणे महापालिकेला देण्यात यावी. याकडे बापट आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधले. कोविड लसीकरणाकरिता खाजगी रूग्णालयांना परवानगी मिळवणे ही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. ती सुलभ करून लसीकरणाचे प्रमाण वाढवावे. तसेच वेंटीलेटरची संख्या वाढवावी यासाठी बापट यांनी केन्द्राकडे आग्रह धरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- क्रिकेटच्या देवाने कोरोनाला हरवलं; सचिनला रुग्णालयातून डिस्चार्ज
- लातूर: ८ हजार रूपयांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात
- पतीच्या मित्राचा विवाहितेवर अत्याचार, साडेआठ लाखही उकळले
- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पंढरपुरातील ‘त्या’ सभेच्या आयोजकांवर अखेर गुन्हा झाला दाखल
- ‘भिडेंनी वैज्ञानिक, डॉक्टरांचा अपमान केलाय,त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
