Share

निवडणुका असणाऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांवर त्वरित निर्बंध घाला – मनसे

Published On: 

मुंबई – कोरोनामुळे महाराष्ट्रात परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे अवघ्या देशाची चिंता वाढली आहे. परिस्थिती भीषण बनत चालली असून काही ठिकाणी वाढत्या रुग्णांना आरोग्य सेवा पुरवताना शासन आणि प्रशानसनावर प्रचंड ताण येत आहे. सरकारी यंत्रणा हतबल ठरत आहेत. वाढत्या मृत्यूदराबरोबरच भीतीही वाढत आहे.

दरम्यान,एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी मनसेने काही उपाय सुचविले आहेत. राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निवडणुका असणाऱ्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित निर्बंध घाला, अशी मागणी मनसेने केली आहे.

मनसे नेते बाळा नांदगावरकर यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘राज्य सरकारने बंगाल, तामिळनाडू, केरळ येथून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. कारण तिथे निवडणुकी दरम्यान सगळे नियम झुगारल्याने येणारे नागरिक हे सुपर स्प्रेडर ठरू शकतात. याबाबत वेळीच नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे’.असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात काल 2 लाख 36 हजार 815 कोरोना चाचण्या झाल्या त्यात 56 हजार 286 नवीन कोरोनाबाधित आढळले चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं हे प्रमाण 23 पुर्णांक 76 शतांश टक्के आहे. आतापर्यंतच्या एकंदर बाधितांची संख्या आता 32 लाख 29 हजार 547 झाली आहे. दैनंदिन बाधितांची संख्या कमी होण्याची चिन्हं दिसत नसली तरी दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र वाढते आहे असे दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!