Share

‘लालू सरकारला ही लाजवेल अशी स्थिती आज महाराष्ट्रात आहे’

Published On: 

सोलापूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून विरोधी पक्षात बसावं लागलेल्या भाजपने आक्रमक भूमिका धारण केली आहे. विविध मंत्र्यांवर होणारे आरोप, कोरोना, अतिवृष्टी यासारखे संकट यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. अशातच, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांमध्ये मुख्य आरोपली असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या लेटर बॉम्बमुळे आता राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

एनआयए कोर्टासमोर वाझेचे हस्तलिखित पत्र सादर केलं आहे. या पत्रात सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील खंडणी मागण्यासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे.

SBUT वरील चौकशी थांबवण्यासाठी व बृहन्मुंबई महापालिकेच्या काही ठेकेदारांकडून पैसे वसूल करण्यास सांगितल्याचे सचिन वाझे याने आपल्या पत्रात नमूद केलं आहे.यावरून राजकारण तापायला लागले आहे. भाजपकडून जोरदार टीका केली जात असून, अनिल परब यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

भाजप आमदार राम सातपुते यांनी महाविकास आघाडी सरकारची तुलना लालू प्रसाद यादव यांच्या सरकारशी तुलना केली आहे. ‘तत्कालीन लालू सरकारला लाजवेल अशी स्थिती आज महाराष्ट्रात आहे.. रोज भ्रष्टाचाराचे नवीन किस्से कानावर येत आहेत.’ असा टोला राम सातपुते यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!