Share

शरद पवार, नितीन गडकरी यांना राहुरी विद्यापीठाची मानद डॉक्टरेट

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३५ वा पदवीप्रदान समारंभ गुरुवारी, २८ ऑक्टोबरला ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ३५ व्या पदवीप्रदान समारंभात माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार व केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन सन्मानित करण्यात येईल.

यावेळी उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्रसिंह राठौड हे दीक्षान्त भाषण करणार आहेत. पदवीदान समारंभात प्रतिकुलपती तथा कृषिमंत्री दादा भुसे मनोगत व्यक्त करणार आहेत. पदवीप्रदान समारंभात दोन वर्षातील विविध विद्याशाखांतील एकूण ११ हजार ४६८ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीने कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्याद्वारे अनुग्रहित करण्यात येणार आहे. यामध्ये विद्या शाखांतील १० हजार ७३६ स्नातकांना पदवी, ६२८ स्नातकांना पदव्युत्तर पदवी, तर १०४ स्नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहित केले जाईल.

यशस्वी स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदके आणि रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या समारंभात केवळ पारितोषिके प्राप्त स्नातक व आचार्य पदवी स्नातकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. अन्य स्नातकांना संबंधित महाविद्यालयात ऑनलाइन पध्दतीने अनुग्रहित करण्यात येणार आहे. या समारंभासाठी विद्यापीठ कार्यकारी आणि विद्या परिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. ३५ व्या पदवीदान समारंभाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या यु-ट्युब चॅनेल व झुम लिंकवरून केले जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!