Share

‘त्यांना आहे तिथेच ठेवा, इथे आले तर…’, फडणवीसांचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दादरा नगर हवेतीतील लोकसभा पोट निवडणुकीसाठीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून त्यामुळे सर्व पक्षनेते पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजपाची दादरामध्ये जाहीर सभा झाली. या सभेमदरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यावेळी बोलत असतांना फडणवीस म्हणाले की,’ते मोदींचे नाव घेऊन निवडून आले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन बसले. हे लोक फक्त संधीसाधू आहेत. जेव्हा त्यांना निवडणुका लढायच्या असतात, तेव्हा मोदींची आठवण येते आणि निवडणुका झाल्यावर त्यांना सत्ता दिसू लागते.’ तसेच ‘शिवसेनेकडून महाराष्ट्रात वसुली सरकार चालवलं जात असल्याचं देखील फडणवीस यावेळी म्हणाले. “शिवसेनेचा मुंबईचा इतिहास पाहा. तिथे ते करत असलेलं काम पाहा. जसं तिथे त्यांचं काम सुरू आहे, वसुली सुरू आहे, ते पाहाता महाराष्ट्रातलं सरकार आता सरकार नसून वसुली सरकार झालं आहे. तीच वसुली ते दादरा-नगर हवेलीत आणू इच्छित आहेत,’ असा आरोपही फडणवीस यांनी केला.

दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’ते जिथे आहेत, त्यांना तिथेच ठेवा. ते इथे आले, तर नाव तर महाराष्ट्राचं घेतील, पण काम मोघलांचं करतील.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!