वैजापूर : मागील काही दिवसांपासून राज्यातील ॲानर किलींगच्या घटना वाढत चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. असे असतांनाच औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावाने कोयत्याने वार करत बहिणीचे मुंडकं छाटून हत्या केल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी राज्यात होणारे ॲानर किलींग सरकारसाठी आणि पोलिस यंत्रणेसाठी निंदास्पद असल्याचे म्हंटले आहे. यासंदर्भात ट्विट करत त्या म्हणाल्या की,’प्रेमविवाह करून सुखानं नांदत असलेल्या पोटच्या मुलीची खोट्या प्रतिष्ठेपायी आई आणि भावाने मिळून मुंडकं कापून हत्या केली आहे. आरोपी मुलगा सज्ञान आहे परंतु त्याला अल्पवयीन दाखवण्याची धडपड सुरू आहे. यामध्ये पोलिस निरीक्षकाची भूमिका संशयास्पद आहे. तसेच राज्यात होणारे ॲानर किलींग सरकारसाठी आणि पोलिस यंत्रणेसाठी निंदास्पद आहे. त्यामुळे ॲानर किलींग होऊ नये यासाठी जनजागृती मोहिम मोठ्या प्रमाणात राबवली जाण्याची गरज आहे त्यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलावं’, असेही त्या म्हणाल्या आहेत.
राज्यात होणारे ॲानर किलींग सरकारसाठी आणि पोलिस यंत्रणेसाठी निंदास्पद आहे… तातडीनं सासरच्या लोकांना सुरक्षा पुरवण्याची विनंती पोलिसांना केलीये
ॲानर किलींग होऊ नये यासाठी जनजागृती मोहिम मोठ्या प्रमाणात राबवली जाण्याची गरज आहे त्यासाठी सरकारनं ठोस पाऊल उचलावं..(२/२)
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 10, 2021
दरम्यान, वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- जंगलपहाडातला योद्धा शेवटी जंगलातच कोसळला- संजय राऊत
- तुमचे खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आलेत; शंभुराज देसाईंचा चंद्रकांत पाटलांना टोला
- आपल्या हक्कांबरोबरच इतरांच्या हक्कांबद्दलही जागरूक राहणे महत्वाचे-अमोल कोल्हे
- बिपीन रावत यांच्यासह इतरांवर आज अंत्यसंस्कार; पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
- मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी मानवी हक्कांचे रक्षण आवश्यक- शरद पवार


