Share

हनीट्रॅपमुळे फक्त मुंडेंची नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीची बदनामी होत आहे – संजय राऊत

Published On: 

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केले आहेत. रेणू शर्मा असं त्यांचं नाव असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप एका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे फेटाळून लावले आहेत.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘घाईघाईने यासंदर्भात कोणतेही निर्णय घेतले जाऊ नयेत. अर्थात याचे अधिकार हे शरद पवार यांचेच आहेत. काही लोकांनी स्वतःच कोर्ट व कायदा असल्याचं ठरवून कोणाला आरोपी करायचं, कोणाला पदावरून खेचायचं हे परस्पर ते ठरवून टाकतात,’ असा अप्रत्यक्ष निशाणा त्यांनी भाजपवर लगावला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘कालपासून जी मुंडे प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे, ज्या महिलेने धनंजय मुंडेंवर आरोप केले आहेत तिच्याबाबतीत देखील अनेक तक्रारदार आहेत. या तक्रारदार महिलेविरोधातील प्रकरण अधिक गंभीर वाटत आहे. हनीट्रॅप हा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही नव्हता. गेल्या वर्षभरापासून जे बदनाम व चिखलफेकीचं आरोप चाललंय त्याच्यामुळे असे प्रकरण वाढीस लागले असतील तर त्यामध्ये व्यक्तीची बदनामी होत नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची बदनामी होत आहे.’ अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

हे प्रकरण हनीट्रॅपचं ?

२०१० ते २०१५ याकाळात रेणू शर्मा या महिलेने कृष्णा हेगडे यांना संबंध ठेवण्यासाठी वारंवार विचारणा केली. ही महिला ब्लॅकमेल करते अशी माहिती समजताच त्यांनी तिच्या हनीट्रॅपपासून वाचण्यासाठी जो प्रयत्न या महिलेने केला तो धुडकावून लावला असा दावा काल भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी करून पोलिसांमध्ये तक्रार केली.

हेगडे यांना त्यांच्या एका मित्राने वेळीच सावध केल्याचं त्यांनी सांगितलं. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सावध करणाऱ्या मित्राचं नाव जाहीर केलं आहे. मनसेचे नेते मनीष धुरी यांनी आपल्याला सावध केल्याचं ते म्हणाले आहेत. दरम्यान, मनीष धुरी यांनी देखील आता दुजोरा दिला आहे.

‘२००८ सालात मी वेळीच सावध झालो नसतो तर माझाही धनंजय मुंडे झाला असता’ असं मनीष धुरी यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. २००८-९ च्या सालात रेणू शर्मा या महिलेने माझा नंबर मिळवून माझ्याशी संपर्क केला. नुकत्याच स्थापन झालेल्या पक्षाचा विभाग अध्यक्ष असल्याने नागरिक संपर्क करतात असा माझा समज होता. मात्र, या महिलेने माझ्याशी चुकीचे संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केला.’

‘माझ्याशी जवळीक साधून मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न या महिलेने केला. गाण्याचा व्हिडीओ अल्बम बनवण्यासाठी अशाच मोठमोठ्या लोकांना हेरत होती. मी वेळीच सावध झालो होतो. विषय महिलेशी निगडित असल्याने मी पोलिसांत गेलो नव्हतो. मात्र, आता हेगडेंनी पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर मी देखील रीतसर तक्रार करणार आहे.’ असा खुलासा धुरी यांनी काल केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!